Wednesday, April 24, 2024
Homeनगरश्रीरामपूर : विविध संघटनांचा सोमवारी प्रांत कार्यालयावर मोर्चा

श्रीरामपूर : विविध संघटनांचा सोमवारी प्रांत कार्यालयावर मोर्चा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

ब्रेक द चेनच्या नावाखाली लागू केलेला संपूर्ण लाँकडाऊन त्वरित रद्द करून शनिवार व रविवार हे दोन दिवस पूर्ण लाँकडाऊन करून

- Advertisement -

5 दिवस सायंकाळी 7 ते दुसर्‍या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी व जमावबंदी आदेश लागू करावा यासह इतर मागण्यांसाठी व्यावसायीक, कामगार, कष्टकरी जनतेचा सोमवार दि. 12 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा नेण्यात येणार आहे.

प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद करण्याबाबत आदेश काढून विविध वस्तू विक्रीचे दुकाने सुरू राहील्यास त्याच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे अनेक व्यवसायातील कामगारांची उपासमार होणार आहे. 25 दिवसाचे मिनी लाँकडाऊनमुळे उद्योजकांबरोबरच कामगारांतही तीव्र नाराजी आहे.

त्यामुळे संपूर्ण लाँकडाऊन रद्द करून शनिवार व रविवार हे दोन दिवस पूर्ण लाँकडाऊन घ्यावा तसेच बी.पी.एल.ए.पी.एल., अन्न सुरक्षा व केशरी कार्डधारकांना पंतप्रधान कल्याण योजनेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानातून माणसी 5 कीलो मोफत धान्य देण्यात यावे, उधोगधंदे बंद असल्याने विज वितरण कंपनीने विज बिलाची वसुली सक्तीची करु नये या मागणीसाठी 12 एप्रिलला प्रांत कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे.

या मोर्चात सर्वांनी सामील व्हावे, असे आवाहन कामगार नेते नागेश सावंत, आम आदमी पार्टी नगर जिल्हा अध्यक्ष तिलक डुंगरवाल. वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष चरण त्रिभुवन. मराठा स्वंयसेवक संघ तालका अध्यक्ष राजेंद्र भोसले, जे. जे. फांउडेशन अध्यक्ष जोएफ जमादार, श्रीराम सेवा संघाचे अध्यक्ष कुणाला करंडे, आदिवासी पारधी समाज संघटना अध्यक्ष विजय काळे, हिंदू एकताचे अध्यक्ष मंगेश छतवाणी, आखिल भारतीय सेनेचे अध्यक्ष ईमरान शेख, रिक्षा युनियनचे अध्यक्ष शंकरराव लबडे, अशोक सोनवणे, दत्तु काहाने, आनिल ढगे, राजु शेख, भरत जाधव, बंटी आच्छाडा, शिवाजी सावंत, जलील शहा, विष्णु भागवत, बी. एम. पवार, सुरेश मसाळकर, सलीम शेख, प्रविण शिंदे, अमोल सावंत, राजु यादव, सुनील इंगळे, रोहित पवार, साईनाथ वारकर, अविनाश जोगदंड, रोहित डुकरे, श्रीकांत परभळे, अर्जुन बनकर, दीपक परदेशी, राजु पगारे, सुरेश जाधव, भारती शिंदे, सुनंदा वैध, रेहाना शेख, लता माळी, सिंधुबाई बनकर, रेश्मा साबळे, लता चोपड, उषा साबळे, अंबिका बनकर, नंदाबाई कसबे, सुशीलाबाई रोकडे, सिमा रजपूत यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या