सातपुड्यातील चिंचपाणी धरणाजवळ वणव्याचे तांडव

jalgaon-digital
3 Min Read

धानोरा ता.चोपडा – वार्ताहर Chopada

बिडगाव पासून जवळच असलेल्या सातपुडा जंगलात लागणारा वनवा थांबता थांबत नसून ठोस उपाय योजना करण्यास वनविभाग सपशेल अपयशी ठरत आहे.सोमवार रोजी कक्ष क्र.१५९ मध्ये सकाळपासून लागलेला वनवा तब्बल ३० धगधगतच होता. यात शेकडो एकर वनाची राख रांगोळी होऊन करोडो रूपयांच्या वनसंपत्तीचे नुकसानासह असंख्य प्राणी, पक्षींनाही मोठी हानी होऊन जीव गमावण्याची वेळ आली.

तर रात्रीच डि.एफ.ओ.पद्नाभा, आर.एफ.ओ.विशाल कुटे, कैलास अहिरे यांनी येथे धाव घेत १२ वाजेपर्यंत थांबून कर्मचारींना सुचना व मार्गदर्शन केले खरे मात्र ते कुचकामी ठरले व दुर्दैवाने आग उशीरापर्यंत वाढतच राहीली.

जळगाव जिल्ह्यातील यावल वन विभागा अर्तगत येणाऱ्या चोपडा- यावल – रावेर या तिन तालुक्यांना विस्तीर्ण असा १२५ कि.मी.चा भौगोलीक दृष्ट्या वरदान ठरणारा सातपुडा पर्वत लाभला आहे.मात्र एकेकाळी हिरवळीने नटलेला हाच सातपुडा मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड व वारंवार लागणाऱ्या वनव्यांची सुरू असलेल्या दुर्दैवी मालीकेमुळे त्याची वाळवंटी टेकड्यांचा जंगल होण्याकडे वाटचाल सुरू आहे.सोमवारही सकाळपासून १५९ मध्ये वनव्याचा भडका लागून तब्बल ३० तो सुरूच होता.दिवसभर या वनव्याने शेकडो एकर जंगल नेस्तनाबूत करत रात्री पुन्हा रौद्ररूप धारण करीत चिंचपाण धरणापर्यन्त मजल मारली.

तब्बल दोन की.मी परिसराची या वनाव्यात राख रांगोळी झाली.लाखो रूपये खर्चून लावलेली बांबूची नर्सरीही यात जळून खाक झाली. यात करोडो रूपयांची वनसंपत्तीची होळी झाली.वनव्याची माहीती डि.एफ.ओ एस.एच पद्नाभा यांना देताच ते यावल सह फिरस्ती पथकाचा पदभार असलेले आर.एफ.ओ. विशाल कुटे,सामजिक वनिकरण व अडावदचाही पदभार असलेले आर.एफ.ओ.कैलास अहिरे यांच्यासह घटनास्थळी रात्रीच आले व रात्री बारावाजेपर्य थांबून कर्मचारींना मार्गदर्शक सुचना देत वनवा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केले.काही कर्मचारीही जिवाची बाजी लावत आग विझवत होते. मात्र आगीच्या रौद्ररूपा कोणाचेच काहीही चालले नाही.व आगीने शेकडो एकर जंगल आपल्या कुशित घेत संपुर्ण आकाशच रक्ताळलेले केले.दुरवरून दिसणारे हे दृष्य पाहून अंगावर शहारे येत होते.त्यामुळे वारंवार वनवा लावणाऱ्यांना शोधून त्याच्यावर वन्यजीव वधा सारखे गुन्हे दाखल करा अशी मागणी वनप्रेमींमधून होत आहे.

वन्यजीवांचे रक्षण व संरक्षण करणे काळाची गरज असतांना त्यात वनविभाग सपशेल अपयशी ठरत असल्याने संताप व्यक्त होत असून जंगल वाचेल का नाही? अशी भीतीच व्यक्त होत आहे. दररोज वनवा लागून वनाचे पट्टेच्या शेकडो एकरावर पट्टेचे पट्टे नष्ट होत आहेत.अनमोल अशी वनऔषधी,खनिज संपत्ती,मौल्यवान वृक्ष अशी करोडोंची संपत्ती जळून खाक होत आहे.

तर असंख्य पशू पक्षी त्यांची अंडी जळूत पुठील वास्तव्यच नष्ट होत आहे. रात्री च्या अंधारात वृक्षांवर आश्रय घेतलेले पक्षींचा जीव जात आहेत.सरपटणारे व छोटे छोटे प्राणी कित्येक मरत आहेत.तर काही प्राणी जिव वाचविण्याचे आतंकानै सैरवैर होऊन मृत्युमुखी पडत आहेत.एकूनच वनव्यामुळे सातपुड्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.तयीही ठोस उपाययोजना होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.म्हणून वेळीच योग्य त्या उपाय योजना न झाल्यास सातपुडा नामशेष होण्यास वेळ लागणार नाही.

ड्रोन द्वारे ठेवणार लक्ष : चिंचपाणी हद्दीत लागलेला वनवा खुप विस्तीर्ण व दऱ्याखोऱ्यांच्या भागत असल्याने तो विझवतांना अडचणी येत असून वनकर्मचारी रात्रीही प्रयत्न करीत होते.मात्र यापुढे वनवाच लागू नये यासाठी या भागात जनजागृत करून ड्रोन कॅमेरा द्वारे लक्ष ठेवले जाईल.

-एस.एच.पद्नाभा (डि.एफ.ओ.)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *