Saturday, May 11, 2024
HomeनाशिकNashik Crime News : शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक करून द्राक्ष व्यापारी फरार; अखेर...

Nashik Crime News : शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक करून द्राक्ष व्यापारी फरार; अखेर पोलिसांच्या तावडीत सापडलाच

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शेतकऱ्यांची (Farmers) लाखो रुपयांची फसवणूक करून फरार झालेल्या भामट्या द्राक्ष व्यापाऱ्याला वणी पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या (Farmers) कामगिरीची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप (Shahji Umap) यांनी तपास पथकास १० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

- Advertisement -

वणी पोलीस ठाणे हद्दीतील हस्तेदुमाला शिवारात एका द्राक्ष व्यापाऱ्याने फेब्रुवारी 2023 मध्ये 6 शेतकऱ्यांचा द्राक्ष माल खरेदी करून शेतकऱ्यांना कोणतेही चेक व पैसे न देता ४९,१९,०५२ रूपये किंमतीची आर्थिक फसवणूक केली होती. या बाबत हस्तेदुमाला येथील शेतकरी गणेश बबनराव महाले यांनी फिर्याद दाखल केली होती. त्यानूसार वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Nashik Accident News : अज्ञात वाहनाने कट मारल्यामुळे दुचाकी आदळली दुभाजकावर; एका विद्यार्थ्याचा मृत्यू, दोन जखमी

या गुन्हयातील संशयित मोहम्मद अन्वर शाह (४५, रा. सीतामढी, राज्य बिहार) हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. तो बिहार, गुजरात तसेच मुंबई शहरात आपले अस्तीत्व लपवून वास्तव्य करत होता. वणी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक निलेश बोडखे यांनी त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना आरोपीचा मागोवा काढण्यासाठी सुचना दिल्या होत्या. त्यानूसार पथकाने आरोपीचे सध्याचे वास्तव्याबाबत गोपनीय माहिती काढून तो कल्याण तालुक्यातील बनेली गाव परिसरात असल्याचे खात्रीशीररित्या समजले. 

Nashik Crime News : नाशकात वयोवृद्धाची तब्बल 45 लाखांची फसवणूक

या माहितीप्रमाणे पोलीस पथकाने कल्याण तालुका परिसरात स्थानिक पोलीसांचे मदतीने शाहला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्या कडून २ गावठी कट्टे मिळाले आहे. तर त्या विरुध्द कल्याण तालुका पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यात शाह हा कल्याण जिल्हा कारागृह येथे न्यायालयीन कोठडीत असल्याने न्यायालयाकडून त्याचा ताबा घेऊन त्यास वणी पोलीस ठाण्यातील फसवणूकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्याला दिंडोरी न्यायालयात हजर करण्यात आले होते, न्यायालयाने २८ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

या गुन्ह्याचा तपास अपर पोलीस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण विभाग पुष्कराज सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पो.स्टे. चे सपोनि निलेश बोडखे, पोउनि प्रविण उदे, पोना कुणाल मराठे, पोकॉ राहुल आहेर तसेच पोना हेमंत गिलबिले व प्रदीप बहिरम यांच्या पथकाने केला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

बंद करा, बंद करा, दारूचे दुकान बंद करा; ठाकरे गटाचे सारडा सर्कल भागात आंदोलन

- Advertisment -

ताज्या बातम्या