Thursday, April 25, 2024
Homeनगरवांगदरी सेवा संस्थेत होणारी अडवणूक थांबवावी : नागवडे

वांगदरी सेवा संस्थेत होणारी अडवणूक थांबवावी : नागवडे

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

तालुक्यातील वांगदरी सेवा सोसायटीमध्ये सभासद शेतकर्‍यांची होणारी अडवणूक थांबविण्याबाबत

- Advertisement -

वांगदरी सेवा सहकारी सोसायटीमध्ये नवीन सभासद होण्यासाठी व कर्ज प्रकरण मंजूर करणेसाठी सभासदांची मुद्दाम अडवणूक करून सोसायटीचे चेअरमन व सचिव नेत्याला भेटल्याशिवाय तुमचे कर्ज व नवीन सभासदत्व मिळणार नसल्याचे सांगितले जात असल्याने सेवा संस्थेच्या कारभाराबाबतीत भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे तक्रार केली आहे.

वांगदरी सेवा सहकारी सोसायटीमध्ये नवीन सभासद होण्यासाठी व कर्ज प्रकरण मंजूर करणेसाठी सभासदांची मुद्दाम अडवणूक करून सोसायटीचे चेअरमन व सचिव नेत्याला भेटल्याशिवाय तुमचे कर्ज व नवीन सभासदत्व मिळणार नसल्याचे सांगून आडमुठेपणाची भूमिका घेतली जाात आहे.

नेत्यांद्वारे काही संचालक व सभासदांना दमबाजी, अरेरावी व तुमचे कर्ज मंजूर करणार नसल्याची धमकी दिली गेली आहे. तोंड पाहून नवीन सभासद करणे व कर्ज मंजूर न करणे, असा चुकीचा कारभार सोसायटीमध्ये चालू आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करून सभासदांना योग्य तो न्याय देण्यात यावा.

तसेच श्रीगोंदा तालुक्यातील अन्य सहकारी सोसायट्यांमध्येही सभासदांची अडवणूक करण्याचे प्रकार घडत आहेत. जिल्हा सहकारी बँकेच्या नियमानुसार सर्व सभासदांना अडवणूक न करता नवीन कर्ज वितरीत करण्याबाबत तालुक्यातील सर्व सोसायटी चेअरमन, सचिव व बँक शाखा अधिकारी यांना योग्य ते आदेश देण्यात यावेत,

असे न केल्यास भारतीय जनता पार्टी श्रीगोंदा यांच्यावतीने शेतकरी सभासद हित लक्षात घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याबाबत भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी निवेदन दिले आहे. कारभारात सुधारणा केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला असून या निवेदनावर नितीन शेलार, महेश क्षीरसागर, अमोल शेलार आदींच्या सह्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या