Thursday, April 25, 2024
Homeनाशिकवंदे भारतम् नृत्य महोत्सव-2023 : नाशिकच्या कीर्ती कला मंदिराची निवड

वंदे भारतम् नृत्य महोत्सव-2023 : नाशिकच्या कीर्ती कला मंदिराची निवड

नाशिक | प्रतिनिधी Nashik

भारत सरकारच्या “आजादी का अमृत महोत्सव” या उपक्रमा अंतर्गत ‘वंदे भारतम् नृत्य महोत्सव 2023’ ( Vande Bharatam Dance Festival 2023) साठी नाशिकच्या कीर्ती कला मंदिरच्या ( Kirti Kala Mandir ) दुर्वाक्षी पाटील, श्रुती देवधर, मृदुला तारे यांची निवड झाली आहे. वंदे भारतम् साठी भारतातील नॉर्थ झोन, नॉर्थ सेंट्रल झोन, साऊथ झोन, साऊथ सेंट्रल झोन, ईस्ट झोन, ईस्ट सेंट्रल झोन, वेस्ट झोन व वेस्ट सेंट्रल झोन अश्या विविध झोनमधून ऑडिशन घेतल्या गेल्या. त्यानंतर साऊथ सेंट्रल झोन चा पहिला राऊंड मुंबई येथे व दुसरा राउंड नागपूर येथे झाला ज्या मध्ये नाशिकच्या कीर्ती कला मंदिराची फायनल साठी निवड झाली.

- Advertisement -

अंतिम फेरी दिल्ली येथे मिनिस्टर ऑफ कल्चर माननीय ग. किशन रेड्डी व मिनिस्टर ऑफ स्टेट ऑफ कल्चर मीनाक्षी लेखी यांच्या उपस्थित पार पडला आणि निवड प्रक्रिया पद्मश्री शोवना नारायण व डॉ. मंजरी देव यांनी केली. ग. किशन रेड्डी, मीनाक्षी लेखी आणि ज्येष्ठ नृत्यांगना आणि पद्मश्री सम्मानित नलिनी आणि कमलिनी अस्थाना यांच्या उपस्थित निकाल जाहीर झाले ज्या मध्ये कीर्ती कला मंदिर चे नाव होते.

कीर्ती कला मंदिर च्या ग्रुप मध्ये तीन मुली होत्या ज्यापैकी श्रुती देवधर आणि मृदुला तारे यांनी अदिती ताईच्या मार्गदर्शनाखाली विशारद पूर्ण केले व दुर्वाक्षीने अलंकार व मास्टर्स इन परफॉर्मिंग आर्ट्स पूर्णाकरून CCRT ची शिषवृती मिळवली. या ग्रुपची नृत्य संरचना तिन्ही राऊंडच्या वेळेस गुरू अदिती पानसे यांनी केली व त्यांच्या मार्गदर्शनाने मुलींनी तिन्ही फेऱ्या जिंकल्या.

सर्व झोन मधून निवडलेल्या ग्रुप्सना 26 जानेवारी 2023 रोजी दिल्लीत, माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर राजपथ वर दर वर्षी होणाऱ्या राष्ट्रीय परेड मध्ये नृत्य सादर करण्याची संधी मिळणार आहे.

या स्पर्धेद्वारा कीर्ती कला मंदिराच्या मुलींनी, गुरु अदिती पानसेंच्या मदतीने अटकेपार झेंडा लावला. कीर्ती कला मंदिर च्या संचालिका व ज्येष्ठ नृत्यांगना रेखाताई नाडगौडा यांनी मुलींचे व अदिती ताई चे भरभरून कौतुक केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या