Thursday, April 25, 2024
Homeनाशिकवंचित बहुजन आघाडीचा शिंदे सरकारला पाठिंबा नाही- अविनाश शिंदे

वंचित बहुजन आघाडीचा शिंदे सरकारला पाठिंबा नाही- अविनाश शिंदे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

वंचित बहुजन आघाडीचा ( Vanchit Bahujan Aaghadi ) एकही पदाधिकारी अथवा नेता फुटलेला नाही आणि कुणीही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारला पाठिंबा दिलेला नाही.आमचे शहरात प्राबल्य वाढत असल्याने अनेकांच्या पायाखालची वाळू घसरू लागल्यानेच ते अशा प्रकारच्या वावड्या उठवित आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे महानगरप्रमुख अविनाश शिंदे यांनी एका पत्रकान्वये केला.

- Advertisement -

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच ट्विट केले असून त्यात वंचित बहुजन आघाडीच्या नाशिक महानगर आणि ग्रामीणच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी माझी भेट घेऊन आमच्या युती सरकारला पाठींबा दर्शविण्याचा निर्णय घेतला असे म्हटले होते त्यावर एका पत्रकान्वये अविनाश शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले.

नाशकातील वंचित बहुजन आघाडी अभेद्य आहे.सर्व पदाधिकाऱ्यांचा ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा आहे.पक्षाच्या भूमिकेविरुद्ध कुणीही वेडेवाकडे पाऊल उचलणार नाहीं असा मला ठाम विश्वास वाटतो,असेही शिंदे यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे.

वंचित बहुजन आघाडीने नाशकात आपली पाळेमुळे घट्ट केली असून महापालिका निवडणुकीत आम्ही पूर्ण ताकदीनिशी उतरू.बाळासाहेब आंबेडकर व प्रदेश अध्यक्ष रेखा ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या समविचारी पक्षाशी आघाडी करु असेही अविनाश शिंदे यांनी पत्रकात शेवटी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या