Friday, April 26, 2024
Homeनगरवांबोरी घाटात दोन मित्रांना मारहाण करीत लुटले

वांबोरी घाटात दोन मित्रांना मारहाण करीत लुटले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वांबोरी घाटात डोंगरगण (ता. नगर) शिवारात दोन मित्रांना मारहाण करत तिघांनी लुटले. दोन तोळ्याची सोन्याची चेन, चांदीचे ब्रॅसलेट, तीन हजार रुपये रोख रक्कम, मोबाईल असा 76 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली.

- Advertisement -

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन चोरट्यांविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रिश नारायण वर्मा (वय 18, रा. पाईपलाईन रोड, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी क्रिश वर्मा व त्याचे मित्र गाडीवरून वांबोरी घाटातून जात असताना डोंगरगण शिवारात रस्त्यावर अचानक तिघे जण आले. त्यांनी क्रिश व त्यांच्या मित्राला अडविले. मारहाण करीत सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल बळजबरीने काढून घेतला.

क्रिश यांनी घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली असता पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) अजित पाटील, सहाय्यक निरीक्षक निरीक्षक युवराज आठरे यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चाहेर करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या