Thursday, April 25, 2024
Homeनगर‘नोटा’ दाखवा अन् हजार रुपये मिळवा

‘नोटा’ दाखवा अन् हजार रुपये मिळवा

उंबरे |वार्ताहर| Umbare

ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत विजयासाठी उमेद्वारांना अनेक तारेवरच्या कसरती कराव्या लागतात.

- Advertisement -

त्यासाठी अनेक क्लूप्त्या लढवाव्या लागतात. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथेही काही उमेद्वारांनी नामीशक्कल लढविली, मतदानापूर्वी 10 व 20, 50 रुपये दिले, त्याचे क्रमांक नोंदवून विजयानंतर या नोटा दाखवा अन् हजार रुपये मिळवा, अशी नामीशक्कल लढविल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आता विजयी झालेल्या काही उमेद्वारांकडून हे हजार रुपये कधी मिळतात? याबाबत लक्ष वेधले गेले आहे.

राहुरी तालुक्यात 44 ग्रामपंचायतींच्या निवडणुका मोठ्या उत्साहात पार पडल्या. सुमारे 418 उमेदवारांनी ही निवडणूक लढविली. तालुक्याच्या ग्रामीण भागात अनेक उमेदवारांनी निवडून येण्यासाठी अनेकविध प्रकार केले. काहींनी तर चक्क नवस सुद्धा केले. तर काहींनी आमीष दाखवून मतदारांना आकर्षित केले.

त्यानिमित्ताने अनेक ठिकाणी मतदारांना मतदानपूर्व संध्येला लक्ष्मीदर्शन झाले. अशा युक्त्या सुरू असतानाच वांबोरीत काही उमेदवारांनी चक्क 10, 20 व 50 रुपयांच्या नोटा वाटप केल्या. या नोटांचे क्रमांक नोंदवून घेण्यात आले. विजयानंतर त्या नोटा दाखविल्या तर त्याचे हजार रुपये मिळणार असल्याचे गाजर मतदारांना दाखविण्यात आले. आता हे हजार रुपये मिळतील का? असा सवाल वांबोरीच्या राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या