Thursday, April 25, 2024
Homeनगरवाळुंजवस्तीवरील जिल्हा परिषद शाळा झाली डिजिटल

वाळुंजवस्तीवरील जिल्हा परिषद शाळा झाली डिजिटल

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी|Shrigonda

तालुक्यातील टाकळी कडेवळीत गावामध्ये असणारी वाळुंज वस्ती येथील जिल्हा परिषद शाळा लोकसहभागातून टब स्कूल व डिजिटल स्कूल अशी डिजीटल झाली आहे. या डिजीटल शाळेचा उद्घाटन कार्यक्रम नुकताच पार पडला.

- Advertisement -

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब इथापे होते. प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक कैलास ठाणगे यांनी माहिती दिली की, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाळुंज वस्ती या ठिकाणी करोना पुर्व काळात झालेल्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांना मिळालेले बक्षिस व लोकसहभाग करून सुमारे 81 हजार रुपये वर्गणी गोळा झाली होती. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुबक अध्यापनासाठी शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता टॅब व स्मार्ट टीव्ही घेण्याची संकल्पना मांडली.

या संकल्पनेला सर्व पालकांनी व गावचे उपसरपंच डॉ. सुभाष देशमुख यांनी योग्य असा प्रतिसाद दिला. शाळेच्या वर्गणीतून दोन टॅब एक एलईडी संच व डॉ. देशमुख यांनी शाळेसाठी एक टॅब भेट दिला. या माध्यमातून संपूर्ण शाळा डिजिटल करण्यात आली आहे. ही सर्व यंत्रणा कार्यान्वित होण्यासाठी वाय-फाय राऊटर बसवण्यात आले सदर तंत्रज्ञानाचा अध्यापनामध्ये प्रत्यक्ष वापर झाल्याने विद्यार्थ्यांना अध्यापन सुलभ, सोपे आणि आनंददायी होणार असल्याचे मुख्याध्यापक कैलास ठाणगे यांनी सांगितले

सदर कार्यक्रमास विस्तार अधिकारी एस एम ढवळे, केंद्रप्रमुख भदागरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुदाम नवले, उपसरपंच डॉ. देशमुख, चेअरमन महिंद्रा वाळुंज, व्हाईस चेअरमन अशोक वाळुंज, सुभाष वाळुंज, प्रफुल्ल इथापे, नितीन वाळुंज, फक्कड वाळुंज, राहुल वाळुंज, शिवहरी वाळुंज, अशोक वाळुंज , आबासाहेब वाळुंज, दिलीप वाळुंज, रुपेश गोधडे, रावसाहेब वाळुंज, नारायण वाळुंज, वैभव वाळुंज, अशोक नवले, श्री. येरकळ, अंगणवाडी सेविका जगताप आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या