Thursday, April 25, 2024
Homeनगरवाळवणेत पोस्टमनची आत्महत्या

वाळवणेत पोस्टमनची आत्महत्या

सुपा |वार्ताहर| Supa

पारनेर तालुक्यातील वाळवणे येथील पोस्टमन असलेल्या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.24) सकाळी उघडकीस आली. कौटुंबिक कलहाच्या नैराश्येतून त्याने हा प्रकार केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

राजेश संपत ढवळे (वय 39, रा. वाळवणे, ता. पारनेर) असे आत्महत्या करणार्‍या युवकाचे नाव आहे. वाळवणे येथे पोस्टमन म्हणून तो कार्यरत होता. मंगळवारी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान त्याने राहत्या घरी पलंगावर उभे रहात दोरीच्या साह्याने छताला गळफास घेत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. याबाबतची माहिती सुपा पोलीस स्टेशनला कळताच सुपा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.

शवविच्छेदन केल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. दरम्यान, ढवळे यांनी घरातील कौटुंबिक कलहास कंटाळून नैराश्यातून हा प्रकार केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद सुपा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक डॉ.नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली रियाज पटेल पुढील तपास करत आहेत .

वाळवणेत तीन युवकांच्या आत्महत्या

वाळवणे येथे मागील एक वर्षभराच्या कालावधीत तीन तरुणानी गळफास घेऊन आत्महत्या केल्या आहेत. यात अनिल शिंदे (वय 49), दिगंबर शिंदे (वय 42) व काल राजेश ढवळे (वय 39) यांनी फाशी घेऊन जीवनयात्रा संपवली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या