Wednesday, April 24, 2024
Homeनगरवाळकीत दारू अड्ड्यावर पोलिसांचे छापे

वाळकीत दारू अड्ड्यावर पोलिसांचे छापे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना संचारबंदी काळात बेकायदेशीररित्या दारू विक्री करणार्‍या दोन ठिकाणी पोलिसांनी छापे टाकून

- Advertisement -

विदेशी दारूसह 65 हजार 660 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नगर तालुका पोलिसांनी वाळकी (ता. नगर) शिवारात ही कारवाई केली. याप्रकरणी पोलीस शिपाई संदीप जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.

आरोपींमध्ये लक्ष्मण नाना गोरे (वय 34 रा. वाळकी ता. नगर), योगेश मच्छिंद्र कासार (वय 24 रा. वाळकी ता. नगर) यांचा समावेश आहे. वाळकी गावात अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी सुरूवातीला लक्ष्मण गोरे याच्या घरी धाड टाकली.

लक्ष्मण हा दुचाकीच्या डिक्कीमध्ये दारू ठेवून घरासमोर त्याची विक्री करताना मिळून आला. त्याच्याकडून आठ हजार 500 रुपयाची दारू व 50 हजार रुपये किंमतीची दुचाकी पोलिसांनी जप्त केली. दुसरा छापा योगेश कासार याच्या घरी टाकला. योगेश घराच्या आडोशाला विदेशी दारूची विक्री करत असताना मिळून आला. त्याच्याकडून विदेशी कंपनीची 7 हजार 160 रुपयांची दारू पोलिसांनी जप्त केली.

नगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू असल्याची बाब यानिमित्ताने समोर आली आहे. करोनाच्या पहिल्या लाटेतही नगर तालुक्यातील वाळकी, नेप्ती आदी गावांमध्ये हातभट्टी दारूची निर्मिती होत होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी यावेळी छापे टाकून अनेक अड्डे उद्ध्वस्त केले होते.

करोनाच्या दुसर्‍या लाटेतही नगर तालुक्यात अवैध दारू विक्रीने जोर धरला आहे. सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांनी या दारू विक्रीवर कारवाई सुरू केली आहे. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कोणत्याच प्रकारची कारवाई केली जात नाही. यामुळे अवैध दारू विक्री करणार्‍यांना अभय मिळत असल्याचे चित्र आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या