Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशवैष्णोदेवी यात्रा 16 ऑगस्टपासून

वैष्णोदेवी यात्रा 16 ऑगस्टपासून

नवी दिल्ली | New Delhi –

करोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर खंडित करण्यात आलेली वैष्णोदेवीची यात्रा 16 ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे. मात्र या यात्रेसाठी केंद्र सरकारने अत्यंत कडक नियमावली जारी केली आहे. Vaishno Devi Yatra

- Advertisement -

अशी आहे नियमावली

1) मर्यादित संख्येने भक्तांना देवीच्या दर्शनासाठी परवानगी मिळेल.

2) यात्रेदरम्यान मास्क घालने आवश्यक असेल. मास्क शिवाय कोणालाही यात्रा करता येणार नाही.

3) सकाळी व संध्याकाळी होणार्‍या भव्य आरतींमध्ये भक्तांना सहभागी होता येणार नाही.

4) मंदिर परिसरात रात्रभर भाविकांच्या मुक्कामाला बंदी असेल.

5) रात्रीच्या वेळी यात्रा बंद असेल.

6) दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना यात्रेसाठी परवानगी नसेल.

7) 30 सप्टेंबरपर्यंत एका दिवसात जास्तीत जास्त पाच हजार भक्त देवीचे दर्शन घेऊ शकतील.

8) आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करणे बंधनकारक असेल.

9) मूर्ती आणि पवित्र पुस्तकांना स्पर्श करता येणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या