Friday, April 26, 2024
Homeनगरज्यांनी मेनलाईनवर नळजोड दिले तेच आज नळजोड का तोडत नाही अशी बोंब...

ज्यांनी मेनलाईनवर नळजोड दिले तेच आज नळजोड का तोडत नाही अशी बोंब मारत आहेत

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

वर्षानुवर्षे कोपरगाव नगरपरिषदेची सत्ता ताब्यात असताना अनेक माजी नगराध्यक्ष-नगरसेवक व नेत्यांनी सर्वसामान्य नागरिकांचा विचार न करता

- Advertisement -

मनमानी करून वेळोवेळी चुकीच्या पद्धतीने नळजोड दिले. त्यातील काहींनी पैसे खाऊन, काहींनी वॉर्डमध्ये मतदार खूष ठेवून राजकारण करण्यासाठी, काहींनी नेत्यांच्या आदेशावरून मेन लाईनवर नळजोड देऊन ठेवले. तेच आज मेनलाईनवरील नळजोड का तोडत नाही अशी बोबांबोब करीत असल्याचा आरोप नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केला आहे.

नगराध्यक्ष वहाडणे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, पालिकेत पदे भोगणार्‍यांना आजही शहरातील काहींना 24 तास, काहींना 12 तास, काहींना 8 तास, काहींना 6 ते 4 तास पाणी मिळते. सर्वसामान्य नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवून बेजाबदारपणे सत्ता भोगणार्‍यांनी पाणी वितरण व्यवस्थेचा बोजवारा उडविला आहे.

सत्ता भोगून झालेलेच काहीजण आज पाणी का पुरत नाही, दिवसाआड पाणी द्या, मेन लाईनवरील नळजोड का तोडत नाही असे विचारत आहेत, निवेदन देऊन आपल्यालाच जनतेची फार काळजी असे भासवत आहेत. कुठलाही विचार न करता मेनलाईनवरील नळजोड तोडायचे ठरल्यास शहरातील अनेक रस्ते फोडावे लागतील.

म्हणून रस्त्यांचे नुकसान न करता बेसुमार पाणी वापरणारे नळजोड कमी करण्याचे नियोजन सुरू आहे. नगरपरिषदेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेक नविन सेवक जागे झाले आहेत. मी जाहीर करतो, बेसुमार पाणी वापर होणारे नळजोड कुणाचाही मुलाहिजा न ठेवता तोडले जातील, तसे नियोजन सुरू आहे.

बेसुमार पाणी वापरणारे कोण कोण आहेत हे नगरपरिषदेत येऊन तुम्ही पाहू शकता. मेनलाईनवर नळजोड असलेले माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी मात्र 2012 मधेच स्वतःहून नगरपरिषदेला पत्र दिले की, माझे मेनलाईनवरील नळजोड बदलून सबलाईनवर घ्यायला मी तयार आहे.

श्री. झावरे यांनी मनाचा मोठेपणा दाखविला तसा मनाचा मोठेपणा दाखविणे इतरांना का जमले नाही? अनेकजण नगराध्यक्षपद भोगून गेले त्यांनी असे नळजोड का तोडले नाहीत. पैसे खाऊन का नळजोड वाटले? याचे जनतेला उत्तर द्या.मी मात्र असे नळजोड कमी करून शहराचे पाणी वाचविण्यासाठी काम करत आहे याची खात्री बाळगावी, असेही नगराध्यक्ष वहाडणे यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या