Friday, April 26, 2024
Homeनगरकुंटणखाण्यावरील छाप्यात 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कुंटणखाण्यावरील छाप्यात 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील वडगावपान (Vadgav Pan) परिसरातील विशाल गार्डन हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या साई माया लॉजमध्ये पोलिसांनी छापा (Police Raid) टाकल्यानंतर या प्रकरणात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. त्यांच्याकडून 41 हजार रुपयांचा ऐवज जप्त (Seized) करण्यात आला.

- Advertisement -

भाजपच्या नव्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा
ना. विखे तर आ. थोरातांचाही प्रयत्न; कोणी केला दावा ?

संगमनेर तालुक्यातील (Sangamner Taluka) वडगावपान परिसरातील लॉजमध्ये (Lodge) गेल्या काही महिन्यांपासून खुलेआम शरीर विक्रीचा व्यवसाय (Prostitution) सुरू होता. याबाबत श्रीरामपूरचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांना माहिती समजत त्यांच्या पथकाने सोमवारी रात्री नऊ वाजता सुमारास या लॉजवर छापा (Police Raid) टाकला होता. या लॉजमध्ये काहीजण संगनमताने स्वतःचे आर्थिक फायद्या करिता कुंटण खाना (Prostitution) चालवत होते. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये (Police Raid) कुंटण खाण्यासाठी लागणारे साहित्य आढळले होते. याबाबत सहाय्यक फौजदार विष्णू आहेर यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात (Sangamner Police Station) फिर्याद दिली.

कुटूंबनियोजनाचे पुरूषांना वावडे!

या फिर्यादीवरून पोलिसांनी प्रतीक बाळासाहेब चित्तर (रा. वडगावपान), एक महिला, खेमराज कृष्णराज उपाध्याय (रा. वडगावपान) यांच्याविरुद्ध गुन्हा नैतिक व्यापारास प्रतिबंधक कायदा 1956 चे कलम 3, 4, 5, 7, 8 प्रमाणे गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे हे करीत आहे.

नाशिक पदवीधरसाठी 16 उमेदवार रिंगणात

पोलीस पथकाने रात्री नऊ वाजेच्या सुमारास टाकलेल्या या छाप्यामध्ये 1 हजार रुपये रोख, 20 हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल, 20 हजार रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल, कंडोम असा एकूण 41 हजार रुपयांचा ऐवज जप्त (Seized) करण्यात आला. यातील आरोपी हे बदलापूर पाईपलाईन रोड, जिल्हा ठाणे येथील एका 22 वर्षांच्या महिलेस पुरुष ग्राहकांबरोबर शरीर संबंध करण्याकरिता (Prostitution) जागा उपलब्ध करून देऊन महिलेस वेश्या गमना करिता प्रवृत्त करून त्यांना पुरुष गिर्‍हाईकांना दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय (Prostitution) करून घेऊन त्यावर मिळणार्‍या पैशावर आपली उपजीविका भागवून अवैद्यरित्या कुंटणखाना चालवत होते. अनेक महिन्यापासूूून त्यांचा हा उद्योग सुरू होता.वडगावपान परिसरातील या हॉटेलमध्ये हा उद्योग खुलेआम सुरू होता. दरम्यान पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे लॉज चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

30 लाख लाभार्थ्यांना मिळणार मोफत धान्य

नगरच्या पोलीस कर्मचार्‍याचे संगमनेरच्या लॉज चालकांशी लागेबांधे

संगमनेर शहर व तालुक्यातील काही लॉज मध्ये खुलेआम असे व्यवसाय सुरू आहेत. शहर व तालुका पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. संगमनेर येथे पूर्वी नियुक्तीस असलेला व सध्या अहमदनगर येथे काम करत असलेला एक पोलीस कर्मचारी दरमहा अशा लॉजमधून हप्ते वसुली करीत असल्याची चर्चा आहे. दर महिन्याला एका खाजगी वाहनातून येऊन तो संगमनेर येथे अशी वसुली करीत असल्याने वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्याचे विरुद्ध कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

सदर ठिकाणी ज्या मुलीला आणण्यात आले होते. त्या मुलीला आणण्यात ज्याचा मोठा वाटा होता. त्या इसमाला सदर मुलीच्या मोबाईलवरुन त्याचे टॉवर लोकेशन घेण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे या प्रकरणात चौथा आरोपी लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलीस सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या