Thursday, April 25, 2024
Homeनगरवडाळा बहिरोबा ग्रामपंचायतीला ‘स्मार्ट ग्राम’चा पुरस्कार प्रदान

वडाळा बहिरोबा ग्रामपंचायतीला ‘स्मार्ट ग्राम’चा पुरस्कार प्रदान

वडाळा बहिरोबा |वार्ताहर| Vadala Bahiroba

नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा ग्रामपंचायतीची स्मार्टग्राम पुरस्कारासाठी निवड झाल्यानंतर

- Advertisement -

काल मंगळवारी अहमदनगर येथे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते लोकनियुक्त सरपंच मिनलताई मोटे यांनी पुरस्कार स्विकारला.

वडाळा बहिरोबा गावाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावा असा प्रसंग अनुभवावयास मिळाला. माउली संकुल अहमदनगर येथे, राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते लोकनियुक्त सरपंच मिनलताई मोटे यांचा स्व. आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार वडाळा बहिरोबा गावाला देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्रीताई घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके, अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख, उपमुख्य अधिकारी निखीलकुमार ओसवाल, वासुदेव साळुंखे, परीक्षित यादव, नेवाशाचे गटविकास अधिकारी शेखर शेलार, विस्तार अधिकारी नवनाथ पाखरे व जिल्हा परिषद अधिकारी, पदाधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीत मोठ्या दिमाखात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

वडाळा गावची ओळख या पुरस्काराने आदर्श गाव म्हणून झाली असून, राज्यात यापुढे वडाळा बहिरोबा हे गाव सुंदर आदर्श गाव म्हणून नावारूपाला येईल, हा पुरस्कार मिळवताना राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, अर्थ व पशुसंवर्धन समिती सभापती सुनील गडाख, मुळाचे संचालक भाऊसाहेब मोटे, ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यामुळेच आज वडाळा गावं आदर्श गाव म्हणून सन्मानित झाले याचा आनंद होत असल्याचे सरपंच मिनलताई मोटे म्हणाल्या.

यावेळी ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक अ‍ॅड. चांगदेव मोटे, ग्रामविकास अधिकारी ज्ञानदेव शिंदे, सतीश मोटे, उपसरपंच राजश्रीताई घाडगे, ग्रामपंचायत सदस्य राहुल मोटे, अतिष मोटे, राजेंद्र मोटे, दत्ता मोटे, अमोल पतंगे, आप्पासाहेब मोटे, पावलस गाढवे, सुरेश नवगिरे, विजुताई ओनावले, दशरथ कांबळे, राजू मोटे, महेश मोटे, तंटामुक्ती अध्यक्ष रामचंद्र मोटे, ग्रामस्थ दीपक घाडगे भागचंद जाधव, संदीप मोटे, राजेश मोटे, मेहमूद शेख, माणिक मोटे, नामदेव मोटे, प्रकाश मोटे, उमेश पतंगे, धनंजय पतंगे, ग्रामपंचायत कर्मचारी राजेश मोटे, विशाल मोटे उपस्थित होते. या पुररस्काराने तालुक्यात तसेच सर्व परिसरातून गावाचे कौतुक होत आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या