Friday, April 26, 2024
Homeनगरवडाळ्यात विनाकारण फिरणार्‍यांची अँटीजेन चाचणी

वडाळ्यात विनाकारण फिरणार्‍यांची अँटीजेन चाचणी

वडाळाबहिरोबा |वार्ताहर| Vadala Bahiroba

नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे विनाकारण फिरणार्‍यांची रॅपिड अ‍ॅन्टीजेन करोना चाचणी कण्याची मोहीम शनीशिंगणापूर पोलिसांनी राबविली. यामुळे रस्त्यांवर विनाकारण फिरणार्‍यांच्या संख्येवर नियंत्रण आले.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, शनीशिंगणापूर पोलीस ठाणे व वडाळा बहिरोबा ग्रामपंचायतीच्यावतीने सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांच्या उपस्थितीत विनाकारण फिरणार्‍यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी जागेवरच करोना अ‍ॅन्टीजेन चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात येवून प्रत्यक्ष कार्यवाही करण्यात आली. यावेळी संक्रमित आढळून आलेल्यांची तात्काळ कोविड सेंटरमध्ये रवानगी करण्यात आली.

यावेळी अ‍ॅड. चांगदेव मोटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. काळे, आरोग्य सेवक श्री. चेमटे व त्यांचे सहकारी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे व ग्रामपंचायतचे कर्मचारी उपस्थित होते. या कारवाईने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन ग्रामपंचायतवतीने करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या