Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशकोरोनाविरुद्धची लढाई : देशात लसीकरणाचा टप्पा 160 कोटींवर

कोरोनाविरुद्धची लढाई : देशात लसीकरणाचा टप्पा 160 कोटींवर

देशात कोरोनाविरूध्दच्या लढाईत भारतातील लसीकरणाचे (vaccination)खुप मोठे योगदान आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लसीकरणाचा मोठा फायदा झाला आहे. लसीकरणाच्या मोहिमेसंदर्भात (campaign of vaccination)गुरुवारी चांगली बातमी आली. देशाने १६० कोटी डोसचा टप्पा पार केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय (Dr Mansukh Mandaviya)यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून दिली आहे.

मनसुख मांडवीय यांनी ट्वीट केले आहे, “जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम पंतप्रधानांच्या नेतृत्वात नवीन उंची गाठत आहे. लसीकरणाच्या मोहिमेत एकूण डोसने १६० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. लसीकरण झाल्यानंतरही कोविडच्या नियमांचे पालन करत रहावे.”

- Advertisement -

लसीकरण झालेल्यांचे काॅलेज बंद, पण मुलांच्या शाळा सुरु, काय आहे घोळ?

- Advertisment -

ताज्या बातम्या