Saturday, May 4, 2024
HomeUncategorizedनाशकात अनेक लसीकरण केंद्र बंद : लसी शिल्लक असलेल्या केंद्रांवर गर्दी

नाशकात अनेक लसीकरण केंद्र बंद : लसी शिल्लक असलेल्या केंद्रांवर गर्दी

नाशिक

नाशिक शहरातील ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी मोजक्या केंद्रांवर सोमवारी लसीकरण सुरू होते. लसींचा साठा नसल्यामुळे अनेक केंद्र बंद होते. अनेक ठिकाणी लसींचा साठा नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रावरून परत जावे लागले.

- Advertisement -

नाशिक शहरात शनिवारपासून १८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण सुरू करण्यात आले. त्यासाठी मोजकी केंद्र सुरु होती. तसेच ४५ वर्षांवरील नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांना काहीच केंद्रांवर लसीकरण केले जात होते. शासनाच्या को-विन (https://www.cowin.gov.in/) पोर्टवर या आठवड्यातील नोंदी काहीच ठिकाणी दाखवत आहे. ज्या ठिकाणी नोंदी दाखवत आहे.

नाशिक जिल्ह्यात लसीकरणासीठी १५८ केंद्र आहेत. त्यातील १४६ केंद्र शासकीय आहेत.

नाशिक रोडला लसीकरण बंद

गेल्या तीन दिवसांपासून नाशिक रोड परिसरातील सिन्नर फाटा , जुने बिटको हॉस्पिटलमधील लसीकरण बंद असल्याने नागरिक वयोवृद्ध चे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. मात्र प्रभाग २१ मधील खोले मळात १८ ते ४४ लसीकरण सुरू आहे. या ठिकाणी नागरिक वयोवृद्ध लस बाबत विचारणा करण्यासाठी येतात मात्र येथील शिपाई कर्मचारी अरेरावी भाषेत सांगितले जात आहे. तर दुसऱ्या डोस साठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. मनपा प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

१ मे पासून ऑनलाईन नोंदणी केल्या नंतर लस मिळणार असली तरी गेल्या तीन दिवसांपासून सिन्नर फाटा व बिटकोत लसीकरण बंद असल्याने नागरिक महिला वयोवृद्ध चे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. तर प्रभाग २१ मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू होते. मात्र याठिकाणी दुसरा डोस घेण्यासाठी नागरिक वयोवृद्ध येत होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या