Friday, April 26, 2024
Homeनगरश्रीरामपूरच्या मेनरोडवरील लसीकरण केंद्रावर गोंधळ

श्रीरामपूरच्या मेनरोडवरील लसीकरण केंद्रावर गोंधळ

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरातील लसीकरण खूपच मंद पध्दतीने चालू असून एक दिवस लस आली तर चार चार दिवस लसच येत नाही. त्यामुळे पूर्ण गोंधळ उडाला आहे. दुसर्‍या डोससाठी लसीकरण चालू होते. मात्र दिलेल्या यादीनुसार लोकांनी पाठ फिरवल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून लसीचे डोस शिल्लक राहू लागले. त्यामुळे पहिल्या डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला. अचानक पहिल्या डोसचे लसीकरण चालू झाल्याने लोकांनी एकच गर्दी केली होती. काहींनी गेटची साखळी तोडली तर काहीनी गेट तोडून आत प्रवेश केला. काहींना धक्काबुक्कीही झाली. त्यामुळे अर्धवट लसीकरण थांबवावे लागले. तसेच पोलिसांना पाचारण करावे लागले.

- Advertisement -

आझाद मैदानावर जे लसीकरण सुरु आहे त्यावर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी पालिकेककडे बोट दाखवतात तर पालिकेवाले ग्रामीण रुग्णालयाकडे बोट दाखवत आहे. तासन तास रांगेत लस घेणार्‍यांवर अधिकार्‍यांच्या आणि कर्मचार्‍यांकडून अन्याय होत असल्यामुळे बरेचसे लोक लसीकरणासाठी बाहेर पडत नाही. एकीकडे नागरिकांनी लसीकरण करावे म्हणून जाहिरातबाजी केली जाते तर दुसरीकडे श्रीरामपुरात हा अजब प्रकार पहायला मिळत आहे. त्यामुळे अगोदर वशिलेबाजी करणार्‍यांचे लसीकरण करुन घ्या नंतर आम्हाला बोलवा , अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

काल लसीकरणाच्या दुसर्‍या डोससाठी दोन दिवसापासून नागरिक येत नसल्यामुळे पहिला डोस देण्याचा निर्णय अचानक घेण्यात आला. त्यामुळे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गेट तोडून नागरिक आतमध्ये गेल्याने मोठा गोंधळ उडाला.काहींना धक्काबुक्कीही झाली. हा प्रकार काल रात्रीपर्यंत सुरु होता. याबाबतची माहिती मिळताच प्रांताधिकारी, तहसीलदार लसीकरण केंद्रावर हजर झाले व चौकशी करुन याबाबत माहिती घेतली. त्यानंतर नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्यासह सर्व पक्षीय लोक उपस्थित झाले. त्यांनी यावर नियोजन करुन लसीकरण सुरळीत करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या