Thursday, April 25, 2024
Homeनगरलसीकरणाच्या बोगस प्रमाणपत्राची होणार चौकशी

लसीकरणाच्या बोगस प्रमाणपत्राची होणार चौकशी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

लसीकरण केंद्रावर (Vaccination Center) लस न घेता प्रमाणपत्र (Certificate without vaccination) दिले जात असल्याचा आरोप शहरातील सामाजिक संस्थांनी जिल्हाधिकारी (Collector) व मनपा आयुक्त (Municipal Commissioner) यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केले होते. या सर्व प्रकरणाची तात्काळ मनपा आयुक्त शंकर गोरे (Municipal Commissioner Shankar Gore) यांनी दखल घेत सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर (Health Officer Dr. Satish Rajurkar) यांना देण्यात आले. त्यांनी मंगळवारी महापालिकेच्या माळीवाडा येथील आरोग्य केंद्रास भेट (Municipal Health Center at Maliwada) देऊन पाहणी करून माहिती घेतली व सदर प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी डॉ. गणेश मोहोळकर यांच्याकडे चौकशी करण्याचे आदेश दिले.

- Advertisement -

यावेळी बोलताना डॉ. राजूरकर (Health Officer Dr. Satish Rajurkar) म्हणाले की, कोणत्याही दबावाला न घाबरता महापालिका आरोग्य कर्मचार्‍यांनी काम करावे, आपण चुकीचे काम करू नका. पण चुकीचे काम केल्यास त्यांची गय केली जाणार नाही. तसेच संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. याच बरोबर दररोज दिले जाणार्‍या लसीकरणाचा (Vaccination) व लसीकरण प्रमाणपत्र (Vaccination Certificate) नोंदणीचे तपशील तपासले जाणार आहे. करोनाचे महाभयंकर संकट रोखायचे असेल तर लसीकरण हाच पर्याय आहे. तरी नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे असे आवाहन डॉ. राजूरकर व शशिकांत नजन यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या