Thursday, April 25, 2024
Homeजळगावजिल्ह्यात लंपी आजारावर लसीकरण मोहीम वेगात

जिल्ह्यात लंपी आजारावर लसीकरण मोहीम वेगात

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

जिल्ह्यात लंपी (Lumpy) या आजाराच्या शिरकाव्यानंतर भयभीत असलेल्या शेतकर्‍यांना (farmer) दिलासा देण्यासाठी व लसीकरण मोहीम (Vaccination campaign) जोरात राबवण्यासाठी काल जळगाव (jalgaon) जिल्हा दूध संघामध्ये आमदार मंगेश चव्हाण (MLA Mangesh Chavan) व प्रशासक कमिटीची बैठक झाली होती.

- Advertisement -

या बैठकीत जळगाव जिल्हा दूध संघाचे पशुवैद्यकीय अधिकारी व कृत्रिम रेतन तंत्रज्ञान यांच्या बैठकीत या भागात लंपी या स्कीन डिसीज आजाराचे गुरे ढोरे आढळत आहे. अशा भागात जोरात व्हॅक्सिनेशन करण्याच्या सूचना दिल्या होत्या जिल्हा प्रशासन व दुध संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या मोहिमेत आतापर्यंत आठ हजाराहून अधिक गुरांना लसीकरण झालेले आहे.

जळगाव जिल्ह्यात अधिकचे विस हजार व्हॅक्सिनेशन डोस उपलब्ध झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. त्यामुळे शेतकर्‍यांनी भयभीत न होता आपल्या गुरांना संरक्षण देण्यासाठी व्हॅक्सिनेशन करून घेण्यात यावे. असे आवाहन जळगाव जिल्हा दूध संघातर्फे करण्यात आलेले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या