Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशइस्रायलमध्ये लसीकरणास सुरुवात, पंतप्रधान नेतन्याहू यांनी घेतली पहिली लस

इस्रायलमध्ये लसीकरणास सुरुवात, पंतप्रधान नेतन्याहू यांनी घेतली पहिली लस

दिल्ली । Delhi

अमेरिका, ब्रिटन, रशिया तसेच इतर अनेक विकसित राष्ट्रांनी याआधीच आरोग्य कर्मचाऱ्यांना तसेच वयस्कर आणि गरजू लोकांना लस देण्यास सुरवात केली आहे. आता

- Advertisement -

इस्रायलमध्येही करोना लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शनिवारी करोना लस घेतली. नेतन्याहू ही करोना लस घेणारे इस्रायलमधील पहिले व्यक्ती आहेत. लसीकरण कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात आले.

लस घेतल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले की, इस्रायलमध्ये लवकरच जनजीवन पूर्वपदावर येईल. हा आनंदाचा क्षण असून देशातील सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. इस्रायल पुन्हा एकदा पूर्वपदावर येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

इस्रायलच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी इस्रायलच्या फ्रंट लाइन वर्कर्सना १० रुग्णालये आणि लसीकरण केंद्रावर लस देण्यात येणार आहे. त्यानंतर लसीकरण मोहीम सामान्य नागरिकांसाठी राबवण्यात येणार आहे. लसीकरण्याच्या पहिल्या टप्प्यात ६० हून अधिक वयाच्या नागरिकांना प्राथमिकतेच्या आधारावर लस दिली जाणार आहे. इस्रायलच्या इतिहासातील सर्वात मोठी करोना लसीकरण मोहीम २७ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. इस्रायल दररोज ६० हजार नागरिकांना करोनाची लस देण्याची तयारी करत आहे. या लसीकरण मोहिमेसाठी फायजरच्या लस इस्रायलमध्ये दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. इस्रायलने फायजरसह ८० लाख डोससाठी करार केला आहे.

दरम्यान, भारतातही नव्या वर्षात करोनाची लस उपलब्ध होईल असं सांगितलं जात आहे. भारतात केंद्रीय मंत्रालयानं यासंदर्भात मोठी माहिती दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं की, लोकांना घाबरुन जाण्याची गरज नाही. त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका वक्तव्यात सांगितलं की, स्वदेशी लस तयार करण्यात आली आहे आणि आमच्याकडे 30 कोटी लशीकरणाची क्षमता असेल. भारतातील मृत्यू दर जगातील सर्वात कमी आहे, जो 1.45 टक्के आहे. संपूर्ण भारतात 16 कोटींहून अधिक करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यासह त्यांनी सांगितले की, आमची वैज्ञानिक आणि आरोग्य तज्ज्ञ ही लस बनवण्याचे काम करत आहेत. या संदर्भात, जीनोम सिक्वेंसींग, करोना व्हायरस आयसोलेशन आणि स्वदेशी लस विकसित करण्यात आली आहे. ज्या 6 ते 7 महिन्यांत भारतात 300 दशलक्ष लोकांना लस देण्यास सक्षम असतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या