Thursday, May 9, 2024
Homeदेश विदेशUttarakhand disaster : चमोलीमध्ये १० मृतदेह सापडले, तपोवन धरणाजवळ अनेकजण अडकल्याची भीती

Uttarakhand disaster : चमोलीमध्ये १० मृतदेह सापडले, तपोवन धरणाजवळ अनेकजण अडकल्याची भीती

दिल्ली l Delhi

उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा निसर्गाचा प्रकोप झाला आहे. उत्तराखंडच्या चमोलीमध्ये हिमनग कोसळल्यामुळे हाहाकार उडाला आहे. धौलीगंगा नदीत मोठा हिमकडा कोसळला आहे. त्यामुळे नदीला महापूर आला आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला आहे.

- Advertisement -

दरम्यान, हिमकडा कोसळल्यानंतर ऋषिगंगा ऊर्जा प्रकल्प उद्ध्वस्त झाला आहे. या ठिकाणी काम करणारे जवळपास १०० ते १५० मजूर दुर्घटनेनंतर बेपत्ता झाले होते. यातील, तपोवन धरणात अडकलेल्या १६ जणांना सुखरुप बचावण्यात बचाव पथकाला यश आलंय. घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. अद्याप दहा मृतदेह हाती लागले आहेत तर इतर १०० हून अधिक जण बेपत्ता आहेत. या सर्वांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तपोवन धरणाजवळ पाण्याच्या प्रवाहात अडकून पडलेल्या १६ जणांना वाचवण्यात आल्याचं आणि त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी दिलीय.

दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत म्हणाले की, चामोली जिल्ह्यात आपत्तीची घटना समोर आली आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांना या परिस्थितीला सामोरे जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारच्या अफवांकडे दुर्लक्ष करा. सरकार सर्व आवश्यक पावले उचलत आहे. तसेच, उत्तरांखडमध्ये SDRF टीम नदी शेजारी राहणाऱ्या लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. काही गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. अजूनही काही ठिकाणी लोकं अडकलेली आहे. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. धौलीगंगा नदीला महापूर आला असून नंदप्रयाग, कर्णप्रयाग, देवप्रयाग, रुद्रप्रयाग या परिसरातील हॉटेल, लॉज आणि घरं खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसंच किर्ती नगर, देवप्रयाग, मुनी भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाण्याचा वेग जास्त प्रमाणात असल्यामुळे काही लोकं आणि घरं वाहून गेली आहे,अशी माहिती उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

जोशीमठ तालुक्यातील रैणी गावात आज सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. हिमकडा कोसळून धौली गंगा नदीत कोसळला आहे. त्यामुळे नदीला महापूर आला आहे. हिमकडा कोसळल्यामुळे धरणाच्या भिंतीचा काही भाग कोसळल्याचे वृत्त आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नदीला महापूर आला असून गावांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. खबरदारी म्हणून भागीरथी नदीचे पाणी अडवण्यात आले आहे. अलकनंदाचे पाणी थांबवण्यात यावे यासाठी श्रीनगर धरण आणि ऋषिकेश धरण खाली करण्यात येत आहे.

आयटीबीपीने एक निवेदन जारी केले की, रेणी गावाजवळील धौलीगंगा येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे.पाणी पातळी वाढल्याने अनेक नदीकाठची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. आयटीबीपीचे शेकडो कर्मचारी बचावासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत. तसेच चामोली पोलिसांनी सांगितले की, तपोवन परिसरातील हिमकडा तुटल्यामुळे ऋषीगंगा वीज प्रकल्प दुर्घटनाग्रस्त झाला आहे. धौलीगंगा नदीकाठी राहणाऱ्या लोकांना शक्य तितक्या लवकर सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला जातो आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या