Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशMulayam Singh Yadav : उत्तर प्रदेशात ३ दिवसांचा दुखवटा जाहीर

Mulayam Singh Yadav : उत्तर प्रदेशात ३ दिवसांचा दुखवटा जाहीर

दिल्ली | Delhi

समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांचं आज निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. पोटाच्या आजाराने ते त्रस्त होते. आज सकाळी साडेआठच्या सुमारास अखेरीस त्यांची प्राणज्योत मालवली. ते ८२ वर्षांचे होते.

- Advertisement -

मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर उत्तर प्रदेशात ३ दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केले आहे. त्यांच्या मूळ गावी अंत्यविधी होणार आहेत.

मुलायम सिंह यादव यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९३९ मध्ये उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यात झाला होता. उत्तर प्रदेशात मुलायम सिंह यादव यांची नेताजी म्हणून ओळख होती. १९६७ मध्ये पहिल्यांदा उत्तर प्रदेश विधानसभेत आमदार बनले. १९९२ मध्ये त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली होती. ३ वेळा त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. १९९६ ते १९९८ दरम्यान केंद्रीय संरक्षणमंत्री पदाची जबाबदारीही सांभाळली होती. मागच्या लोकसभा निवडणुकीत ते उत्तर प्रदेशच्या मेनुपुरी लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या