Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशअखेर 'लव्ह जिहाद'विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू

अखेर ‘लव्ह जिहाद’विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू

मुंबई | Mumbai

मागच्या काही दिवसांपासून देशात ‘लव्ह जिहाद’चा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. त्यातच उत्तर प्रदेशात योगी सरकारने लव्ह जिहाद आणि जबरदस्तीने धर्मांतराविरोधी अध्यादेशाचा मसूदा राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे अनुमोदनासाठी पाठवला होता.

- Advertisement -

या अध्यादेशावर आज राज्यपालांनी स्वाक्षरी करत मंजुरी दिली. त्यामुळे आजपासून उत्तर प्रदेशात हे दोन्ही कायदे लागू झाले आहेत.

या कायद्यानुसार, जबरदस्ती करुन, आमिष दाखवून केलं गेलेलं धर्म परिवर्तन हा अजामीनपात्र गुन्हा ठरेल. या कायद्याच्या उल्लंघनाने कमीतकमी 15 हजार रुपयांचा दंड आणि पाच वर्षांपर्यंतची शिक्षा होईल. तेच जर अल्पवयीन अथवा अनुसूचित जाती-जमतीच्या मुलीसोबत केल्यास कमीतकमी 25 हजार रुपयांचा दंड आणि 3 वर्षांपासून ते 10 वर्षांपर्यंतची शिक्षा होईल. बेकायदेशीर सामुहिक धर्म परिवर्तनासाठी कमीतकमी 50 हजार रुपये दंड आणि 3 ते 10 वर्षांपर्यंतची शिक्षा होईल. धर्म परिवर्तनासाठी एक फॉर्म भरुन दोन महिन्याआधी जिल्हाधिकाऱ्यांना द्यायला हवा. त्याचे उल्लंघन केल्यास 6 महिन्यापासून ते 3 वर्षांपर्यंतची शिक्षा आणि कमीतकमी 10 हजार रुपयांचा दंड होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या