Thursday, April 25, 2024
Homeनगरऊसाचे पेमेंट थकवल्याने नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या दारात पेटवून घेण्याचा प्रयत्न

ऊसाचे पेमेंट थकवल्याने नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या दारात पेटवून घेण्याचा प्रयत्न

नेवासा |तालुका प्रतिनिधी|Newasa

संगमनेर (Sangamner) तालुक्यातील कौठे मलकापूर (Kauthe Malkapur) येथील युटेक शुगर (Utech Sugar) या खाजगी कारखान्याने (Private factory) थकवल्याने नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) शेतकऱ्यांनी (Farmers) कारखान्याच्या सरव्यवस्थापक कार्यालयाचे दारात पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) नांदूर शिकारी, कुकाणा, जेऊर, वरखेड व परिसरातील तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांचे चालू गळीत हंगामातील ऊसाचे पेमेंट (Sugarcane Payment) संगमनेर तालुक्यातील (Sangamner Taluka) कौठे मलकापूर येथील युटेक शुगर या खाजगी साखर कारखान्याने (Utech Sugar, a private sugar factory) थकवल्याने शेतकर्यांनी रविवार दि.8 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान आंदोलनाचा (Movement) पवित्रा घेत कारखान्याचे सरव्यवस्थापक बी.एन.पवार यांना चांगलेच खडसावत शेतकऱ्यांना पेमेंट (Farmers Payment) बाबत धारेवर धरले.

मात्र कारखाना व्यवस्थापनाने ठोस उत्तर दिले नसल्याने भाजप युवा मोर्चाचे (BJP Youth Front) तालुका अध्यक्ष सतीश कर्डीले (Taluka President Satish Kardile), छावा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संजय पवार, शंकर लिपणे, नवनाथ म्हसरूप यांनी कारखाना कार्यलयाच्या दारातच पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे गरबडलेल्या व्यवस्थापनाने सोमवार दि.9 ऑगस्ट सकाळीच पेमेंट जमा करण्याचे आश्वासन दिल्याने शेतकरी व व्यवस्थापनचा वाद निवळला.

ऊस पेमेंट बाबत कारखाना प्रशासन, कारखान्याचे अध्यक्ष यांच्याशी शेतकऱ्यांनी वेळो-वेळी संपर्क साधला तर उद्या पेमेंट करतो परवा करतो म्हणून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे.यामुळे याबाबत आपण कोणाकडे न्याय मागावा या चिंतेत शेतकरी पडला आहे. रब्बीच्या बी-भरणासाठी व मुलांच्या शिक्षणासाठी तीन ते चार दिवसांमध्ये आमचे पैसे मिळाले नाही तर आम्ही सर्व शेतकरी कारखान्यावर जाऊन सामुहिक आत्मदहन करणार असल्याचे त्यांनी प्रसिद्ध दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

– सतीश कर्डीले, ऊस उत्पादक शेतकरी

- Advertisment -

ताज्या बातम्या