Friday, April 26, 2024
Homeनगरउस्थळदुमाला येथे वाहनाच्या धडकेत अज्ञात महिलेचा मृत्यू

उस्थळदुमाला येथे वाहनाच्या धडकेत अज्ञात महिलेचा मृत्यू

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा तालुक्यातील उस्थळदुमाला शिवारात अज्ञात वृद्ध महिलेचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली असून याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत रुग्णवाहिकाचालक विशाल दादासाहेब पारधे (वय 25) रा. नेवासाफाटा, मूळ रा. मानोरी, ता. राहुरी याने फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, बुधवारी सकाळी साडेसहा वाजण्यापूर्वी उस्थळदुमाला शिवारात हॉटेल विजयजवळ औरंगाबाद ते अहमदनगर रोडवर नगरला जाणार्‍या बाजूने एक अनोळखी 65 ते 70 वर्षे वय असलेली फिरस्त अनोळखी महिला हीस कोणत्या तरी अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाने जोराची धडक देवून अपघात करून तीच्या कमी अधिक दुखापतीस कारणीभूत ठरला.

महिलेला नेवासाफाटा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचार सुरू असताना सकाळी साडेदहाच्या सुमारास ती मयत झाल्याचे समजले. अज्ञात वाहनावरील चालक महिलेच्या मृत्यूस कारणीभूत झाला तसेच अपघाताची खबर न देता निघून गेला. या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी अज्ञात वाहनाच्या अज्ञात चालकावर धडक देऊन मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या