Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यागर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राज्यात करोना ( Corona ) रुग्णांची संख्या वाढत असली तरीही परिस्थिती नियंत्रणात आहे. सध्या राज्यात मास्क ( Mask )सक्तीची गरज नाही. मात्र, नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope )यांनी बुधवारी येथे केले. करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्याला सतर्कतेच्या सुचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

राज्य सरकारने गुढी पाडव्यापासून राज्य निर्बंध मुक्त केले. मात्र, गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या किंचित वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना टोपे यांनी राज्यातील करोनाची परिस्थिती नियंत्रणात असून लोकांनी घाबरून जाऊ नये, असे सांगितले.

करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मिझोरम या राज्यांना पत्र लिहिले. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आरोग्य मंत्रालयाने सतर्क राहून आवश्यक पावले उचलण्याची सूचना त्यांनी पत्रात केली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत करोना परिस्थितीचे सादरीकरण

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाच्या परिस्थितीचे सादरीकरण करण्यात आले. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचे या सादरीकरणात दिसून आले. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. सध्या कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा वाढत आहे. त्यामुळे काळजी घेत पुढे जावे लागेल आणि मास्कचा वापर पुन्हा सुरु करावा लागेल, अशी चर्चा बैठकीत झाल्याचे सांगण्यात आले. अशी भीती व्यक्त या बैठकीत करण्यात आली असे ते म्हणाले.

गेल्या आठ दिवसांपेक्षा आता कोरोना रुग्णांचे आकडे वाढले आहेत. याबाबत लवकर काही निर्णय घ्यावा लागेल. मात्र, शासनाने काही निर्णय घ्यावा ही अपेक्षा करण्यापेक्षा आपणच आपली काळजी घ्यावी, असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या