Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशभारत-अमेरिका स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम : पंतप्रधान मोदी म्हणाले....

भारत-अमेरिका स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम : पंतप्रधान मोदी म्हणाले….

नवी दिल्ली | New Delhi –

भारत-अमेरिका स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमचे (USISPF) काम उल्लेखनीय असून विविधता असलेले लोकं

- Advertisement -

एकत्र आली आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मोदी यांनी भारत-अमेरिका स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरममला (USISPF)संबोधित केले आहे. त्यावेळी ते बोलत होते. ग्लोबल सप्लाय चेन विकसित करण्यासाठी विश्वास महत्त्वाचा हे महामारीनं दाखवून दिल्याचं यावेळी मोदी म्हणाले. US-India Strategic Partnership Forum (USISPF)

जेव्हा 2020 हे वर्ष सुरू झालं तेव्हा कोणी अशी महामारी येईल याचा विचारही केला नव्हता. सुरूवातीच्या काळात भारतात केवळ एकच करोना चाचणीची लॅब होती. परंतु आता देशभरात 1 हजार 1600 लॅब आहेत. भारतातील करोनामुळे होणार मृत्यूदरही इतर देशांच्या तुलनेत कमी आहे असेही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत हेदेखील सहभागी झाले होते.

या वर्षाच्या सुरूवातीला करोनासारखी महामारी येईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. परंतु या महामारीचा जगातील सर्वांवर परिणाम झाला. ही महामारी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आर्थिक प्रणालीची परीक्षा घेत आहे. सद्यस्थितीत विकासाठी मानव केंद्रीत दृष्टीकोन ठेवणं आवश्यक आहे, असं मोदी म्हणाले. भारतात करोनापासून बरे होण्याचा दरही वेगानं वाढत आहे. देशातील व्यावसायिक, उद्योजकही उत्तम काम करत आहेत. भारत हा आता जगातील दुसर्‍या क्रमांकाचा पीपीई किट तयार करणार देश ठरला असल्याचंही त्यांनी सांगितलं.

एकीकडे करोनाचं संकट असताना दुसरीकडे भारतानं 2 चक्रीवादळासारख्या नैसर्गिक संकटांचाही सामना केला आहे. सध्या भारतात 80 कोटी जनतेला मोफत धान्य पुरवलं जात आहे. तसंच 80 दशलक्ष लोकांना मोफत स्वयंपाकाचा गॅसही दिला जात असल्याचं मोदी म्हणाले. महामारीमुळे अनेक गोष्टींवर परिणाम झाला आहे. परंतु ही महामारी भारतीयांच्या आकांक्षांवर परिणाम करू शकणार नाही, असंही त्यांनी नमूद केलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या