Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशअमेरिकेतील निकालास उशीर का ? : हे आहेत तीन मोठे मुद्दे

अमेरिकेतील निकालास उशीर का ? : हे आहेत तीन मोठे मुद्दे

अमेरिकेची निवडणुकीत आता कायदेशीर लढाईत अडकण्याची शक्यता आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना २१३ तर डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन यांना २२७ इलेक्टोरल व्होट मिळाले आहेत.

विजयासाठी २७० इलेक्टोरल व्होट हवे आहेत. ट्रम्प यांनी निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली आहे.

- Advertisement -

जाणून घेऊ या अमेरिकेच्या निवडणुकीत आता काय होऊ शकते.

१) निवडणूक निकालास उशीर का?

अमेरिकेच्या निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच १० कोटीपेक्षा जास्त मतदान मेलद्बारे झाले आहे. यावर्षी निवडणुकीसाठी १६ कोटी लोकांनीच रजिस्ट्रेशन केले होते. म्हणजेच अर्ध्यापेक्षा जास्त मतदान मेलद्वरे केले गेले. अजूनही अनेक राज्यात मेलद्वारे झालेल्या मतदानाची मतमोजणी केली गेली नाही. यामुळे सध्या जाहीर झालेला निकालही अंतिम समजला जात नाही. मेलद्वारे अालेल्या मतदानाची मतमोजणी होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागू शकतो.

२) कायदेशीर लढाईत जाणार निवडणूक

फक्त मतदानाची मतमोजणी नाही निकालासंदर्भात अनेक प्रश्न विचारले जात आहे. ट्रम्प यांनी काही राज्यात मतमोजणी चुकीची होत असल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. बायडेन यांनीही आपली टीम कायदेशीर लढाईसाठी तयार असल्याचे जाहीर केले. जर असे झाले तर निकाल जाहीर होण्यास काही दिवसांचा कालावधी लागू शकतो.

३) जर टाय झाले तर काय होणार?

प्राथमिक अंदाजानुसार बायडेन आणि ट्रम्प यांच्यात अटीतटीची लढत होत आहे. त्यामुळे 269-269 असा निकाल येऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रसंगात अमेरिकेच्या सिनेटकडे लक्ष लागून असणार आहे. हाउस ऑफ रिप्रेंजटेटिव्ह सर्वात आधी उपराष्ट्राध्यक्षची निवड करेल. त्यानंतर मतदान होऊन संपुर्ण सिनेट राष्ट्रपतीची निवड करेल. या प्रक्रियेत वेळ लागेल. निकाल येण्यासाठी डिसेंबर महिना येईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या