Friday, May 10, 2024
Homeनाशिकखरीप हंगामात शेतकऱ्यांना बसणार युरीया तुटवड्याचा फटका

खरीप हंगामात शेतकऱ्यांना बसणार युरीया तुटवड्याचा फटका

नाशिक । प्रतिनिधी Nashik

चार-पाच दिवसांपासून शहर व जिल्ह्यातील वातावरणात बदल दिसून येत आहे. या बदलामुळे शेतकर्‍यांना आता खरीप हंगामाचे ( Kharif Season) वेध लागले आहे. मान्सून ( Mansoon ) वार्‍याची लागलेली चाहूल व वेळेत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने शेतकर्‍यांकडून शेतीच्या पूर्वमशागतीची (Pre-cultivation of agriculture) तयारी सुरू झाली आहे.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर तयारी करताना रासायनिक खताची मागणी नोंदविण्यात आल्यानंतर जवळपास 20 हजार टन युरिया खताचा तुटवडा (Shortage of urea fertilizer)दिसून येत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना येत्या खरीप हंगामात पुन्हा एकदा खतांच्या तुटवड्याचा सामना करावा लागणार असे चित्र आहे.

येत्या हंगामात सरासरी इतका पाऊस झाल्यास जूनअखेरपर्यंत 50 हजार टनापर्यंत रासायनिक खतांची मागणी वाढणार आहे. यंदा उन्हाळा जेवढा कडक तेवढाच पाऊस देखील बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. सध्या पावसाची चाहूल लागली असून अंदमान व निकोबार बेटावर मान्सूनपूर्व पावसाने हजेरी देखील लावली आहे. सर्वसामान्यांबरोबरच शेतकरीही पावसाची वाट पाहत आहे. मान्सूनची चाहूल लागल्याने शेतीच्या पूर्वमशागतीची कामे करण्याची लगबग सुरू झाली आहे. शेतकर्‍यांना वेळेत खते बियाणे पुरण्यासाठी राज्य सरकारने देखील नियमित खतांची मागणी नोंदवली आहे.

नाशिक जिल्ह्यात एप्रिल व मे महिना मिळून 35 हजार 550 टन युरियाची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यात पंधरा हजार 357 टन युरिया प्राप्त झाला असून 20 हजार 193 टन युरियाचा तुटवडा जाणवत आहे. दरम्यान, कृषी विभागाने युरिया तुटवडा नसून वितरणातील त्रुटींवर बोट ठेवले आहे.

खतांच्या किमती

युरिया – 2450 रुपये प्रति बॅग (45 किलो)

डीएपी – 4,073 रुपये प्रति बॅग (50 किलो)

एनपीके – 3291 रुपये प्रति बॅग (50 किलो)

एमओपी – 2654 रुपये प्रति बॅग (50 किलो)

- Advertisment -

ताज्या बातम्या