Friday, April 26, 2024
Homeजळगावनगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला : आम्हाला त्याची चिंता नाही

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला : आम्हाला त्याची चिंता नाही

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

सत्ता स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडी सरकारबद्दल (Mahavikas Aghadi government) अनेकांनी वेगवेगळ्या चर्चा केल्या. त्याकडे दुर्लक्ष (Ignore) करत सरकारने दोन वर्ष यशस्वी पूर्ण केले आहेत. विरोधक काय म्हणतात (What opponents say) आम्हाला त्याची चिंता नाही. विरोधकांकडून महाभकास आघाडी असे बोलले जात असले तरी आम्ही प्रामाणिकपणे आमचे काम (Honestly our work) करतोय, जनतेचे प्रश्न सोडवतोय. विरोधकांना त्यांचे काम करु द्या,असा टोला नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Urban Development Minister Eknath Shinde) यांनी लगावला.

- Advertisement -

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे लहान चिरंजीव विक्रम यांचा सोमवार दि. 29 नोव्हेंबर रोजी विवाह सोहळा आहे. रविवारी पाळधी येथे हळदीच्या कार्यक्रमाला राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती देवून आशीर्वाद दिले.

त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाविकास आघाडीच्या सरकारला दोन वर्ष पूर्ण झाले असून त्यानिमित्ताने विचारण्यात आलेल्या पत्रकारांच्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून वेगवेगळ्या माध्यमातून ठिकठिकाणी विकासकामे करत आहेत विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देत आहे. जळगाव जिल्ह्यातही रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. शेतकरी असो की सर्वसामान्य प्रत्येकाचे प्रश्न सोडवण्याचे काम आम्ही करतोय असे ना. शिंदे यावेळी म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या