Saturday, April 27, 2024
Homeनगरअर्बन बँक 150 कोटी गैरव्यवहार प्रकरण : आरोपी गायकवाडला अटक

अर्बन बँक 150 कोटी गैरव्यवहार प्रकरण : आरोपी गायकवाडला अटक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर अर्बन बँकेच्या 150 कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी सचिन दिलीप गायकवाड (रा. श्रीगोंदा) याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी श्रीगोंदा येथून ताब्यात घेत अटक केली आहे. या गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक आव्हाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. नुकताच न्यायालयाने आरोपी गायकवाडचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला होता.

- Advertisement -

बँक बचाव कृती समितीचे प्रमुख व बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी 17 फेब्रुवारी 2022 रोजी नगर अर्बन बँकेचे तत्कालीन चेअरमन, संचालक मंडळ, वरिष्ठ अधिकारी व 28 संशयास्पद कर्जदारांचे कर्ज खाते, तत्कालीन चेअरमनचे निकटचे कार्यकर्ते सचिन गायकवाड व आशुतोष लांडगे यांच्याविरुद्ध 150 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. दरम्यान फिर्यादी गांधी यांनी त्यांच्याकडील पुरावे न्यायालयासमोर मांडल्याने आरोपी गायकवाड याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या