Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशUPSC Prelims 2020 : ठरलेल्या दिवशीच होणार परीक्षा

UPSC Prelims 2020 : ठरलेल्या दिवशीच होणार परीक्षा

दिल्ली | Delhi

UPSC 2020 ची पूर्वपरीक्षेची तारीख 4 ऑक्टोबर ठरवण्यात आली आहे. 20 उमेदवारांनी UPSC पूर्वपरीक्षेची तारीख स्थगित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती जी आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज UPSC Prelims 2020 स्थगित करण्याच्या याचिकेवर आज सुनावणी करून निकाल दिला.

- Advertisement -

4 ऑक्टोबरला आयोजित परीक्षा युपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची तसेच 2021 च्या वर्षी एकत्रित घेण्याच्या दोन्ही मागण्या फेटाळल्या आहे. त्यामुळे आता पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार, युपीएससीची परीक्षा 4 ऑक्टोबरलाच होणार आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने स्पर्धा परीक्षांसाठी लास्ट अटेम्प्ट म्हणजेच शेवटची संधी असणार्‍यांना करोनामुळे परीक्षा देता येत नसेल तर त्यांना अजून एक संधी देण्याबाबत विचार करावा अशा सूचना केंद्र सरकारला केल्या आहेत. न्यायाधीश ए.एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

4 ऑक्टोबरला देशात सुमारे 72 शहरांमध्ये 6 लाखाच्या आसपास युपीएससीची पूर्व परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे. ही परीक्षा ऑफलाईन होणार असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत, तोंडाला मास्क लावून परीक्षा द्यावी लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या