Thursday, April 25, 2024
Homeनगरशासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसारच नवरात्र उत्सव साजरा करावा - डॉ. दिपाली काळे

शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसारच नवरात्र उत्सव साजरा करावा – डॉ. दिपाली काळे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

गेल्या दीड वर्षापासून करोना महामारीच्या संकटातून आपण जात आहोत. त्यामुळे राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद होती. मात्र सध्या करोनाची दाहकता कमी झाल्यामुळे शासनाने आजपासून मंदिरे खुली केली आहेत. शासनाने जरी मंदिरे खुली केली असली तरी नागरिकांनी शासनाने ठरवून दिलेले नियम पाळावेत व नवरात्र उत्सव आनंदाने साजरा करावा, असे आवाहन श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. दिपाली काळे यांनी केले आहे.

- Advertisement -

नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीसाठी अप्पर पोलीस अधिक्षक़ डॉ. दिपाली काळे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्यासह शहरातील विविध मंडळातील पदाधिकारी तसेच सर्वच पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके म्हणाले, करोनाच्या दुसर्‍या लाटेत अनेक जणांना प्राण गमवावे लागले. सध्या ही लाट ओसरली असली तरी तिसरी लाट आपल्यासमोर उभी आहे. त्यामुळे नवरात्र उत्सव साजरे करताना आपण ज्या भूमिका मांडल्या त्या श्रध्दा व भावनेच्या आहारी राहून मांडल्या. त्यामुळे सबुरी ठेवा आपण यावर्षी वाचलो तर पुढच्या वर्षी याहीपेक्षा चांगला व धुमधडाक्यात नवरात्र उत्सव साजरा करु. त्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. करोना म्हणजे काय असतो ते आपण करोनात ज्यांचे कोणी गेले असेल त्याला विचारा म्हणून सर्व नियम पाळूनच हा नवरात्र उत्सव साजरा करा, असे सांगितले.

नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक म्हणाल्या, सध्या करोनाची लाट संपलेली नाही. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेवूनच हा उत्सव साजरा करावा. दरवर्षी पालिका प्रत्येक सण उत्सवासाठी सहकार्य करत असते त्याप्रमाणे याहीवेळेस सर्वतोपरी मदत करू. नवरात्र उत्सवासाठी मंडप किती आकाराचा असला पाहिजे हे सर्वानुमते ठरवावे असेही त्यांनी सांगितले.

उपनगराध्यक्ष करण ससाणे म्हणाले, मंदिरे उघडली असली तरी नागरिकांनी कोणत्याही प्रकारची गर्दी करु नये, शासनाचे सर्व नियम पाळूनच या नवरात्र उत्सवाचा आनंद घ्यावा. यावेळी कोणत्याही मंडळाची अडवणूक न करता त्यांना नियमानुसार परवानगी द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी कुणाल करंडे, अशोक उपाध्ये, संजय छल्लारे, मुख्तार शहा, समीर माळवे, राजेंद्र पवार, नागेश सावंत, मनोज नवले, प्रकाश ढोकणे यांची भाषणे झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या