Saturday, April 27, 2024
Homeनगरअप्पर पोलीस अधीक्षक वादग्रस्त ऑडिओ क्लीपप्रकरणी 15 जानेवारीला सुनावणी

अप्पर पोलीस अधीक्षक वादग्रस्त ऑडिओ क्लीपप्रकरणी 15 जानेवारीला सुनावणी

अहमदनगर (प्रतिनिधी) –

पोलीस कर्मचार्‍यासोबत झालेल्या वाद्ग्रस्त संभाषणाची सत्यता पडताळणीसाठी तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड

- Advertisement -

यांना स्वत: च्या आवाजाचा नमुना देण्याचा आदेश जिल्हा न्यायालयाने दिले होते. या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली होती. त्यावर सोमवारी सुनावणी घेण्यात आली असून न्यायालयाने स्थगिती कायम ठेवत पुढील सुनावणी 15 जानेवारीला ठेवली असल्याची माहिती अ‍ॅड. नितीन गवारे यांनी दिली.

नेवासा पोलीस ठाण्याचे कर्मचारी संभाजी गर्जे आणि तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. राठोड यांच्या वाद्ग्रस्त संभाषणाची ऑडिओ क्लीप सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. याप्रकरणाच्या चौकशी दरम्यान डॉ. राठोड यांना आवाजाचे नमुने देण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाने दिला होता. या आदेशाला डॉ. राठोड यांनी अ‍ॅड. नितीन गवारे यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. न्या. विभा कंकणवाडी यांनी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देत यावर सोमवार, 4 जानेवारीला सुनावणी ठेवली होती. सोमवारी सुनावणी झाली. स्थगिती कायम ठेवत पुढील सुनावणी 15 जानेवारीला ठेवण्यात आली आहे.

…………………..

- Advertisment -

ताज्या बातम्या