Friday, April 26, 2024
Homeनगरअसंघटित कामगार काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी कोल्हे

असंघटित कामगार काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी कोल्हे

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नामदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे व इंद्रजितभाऊ थोरात यांचे खंदे समर्थक

- Advertisement -

आणि कोल्हेवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच संजय लहानु कोल्हे यांची काँग्रेसच्या असंघटित कामगार विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे.

कारखाना कार्यस्थळावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात, असंघटित कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मोहम्मद बद्र्जम्मा यांच्याहस्ते संजय कोल्हे यांना जिल्हाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले.

असंघटित कामगारांचे प्रभावी काम करताना त्यांनी तालुक्यातील सुमारे दहा हजार असंघटित कामगारांना न्याय मिळवून दिला आहे. संजय कोल्हे सध्या कोल्हेवाडी ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच म्हणूनही प्रभावी काम करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात व असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष मोहम्मद बद्र्जम्मा यांनी ही जबाबदारी सोपवली आहे.

या माध्यमातून असंघटित कामगारांच्या विविध योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून काम केले यापुढेही आपण नामदार थोरात व इंद्रजीतभाऊ थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक प्रभावीपणे काम करू, असा विश्वास संजय कोल्हे यांनी व्यक्त केला.

त्यांच्या या निवडीबद्दल महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, असंघटित कामगारचे प्रदेशाध्यक्ष ,मोहम्मद बद्र्जम्मा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, यशोधन कार्यालयाचे प्रमुख इंद्रजितभाऊ थोरात, महानंदाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, दुर्गाताई तांबे, शरयूताई देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या