आयमा विश्वस्त मंडळाची बिनविरोध निवड

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक । प्रतिनिधी Nashik

कोविडच्या( Covid ) मोठ्या अंतरानंतर अखेर आयमाच्या ( AIMA )माजी अध्यक्षांच्या सल्लागार मंडळाची निवडणूक घेण्यात आली. आयमा विश्वस्त म्हणून पाच माजी अध्यक्षांची निवड झाली. या पाच माजी अध्यक्षांतून आयमा विश्वस्थ मंडळाच्या अध्यक्षपदी निवड केली जाणार आहे.

कोविडमुळे आयमाची निवडणूक दोन वर्षे पुढे ढकलण्यात आली होती. कोविडचा परिणाम कमी झाल्यानंतर आयमाची पदाधिकार्‍यांची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीनंतर आयमाचे सरचिटणीस ललित बुब याच्या पत्रानुसार माजी अध्यक्षांची बैठक बोलावण्यात आली होती. या वेळी कालावधीच्या क्रमानुसार त्यातील पाच माजी अध्यक्षांची सल्लागार (विश्वस्त समिती) म्हणून निवड करण्यात आली.

या नूतन समितीमध्ये माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर गोपाळे, संदीप सोनार, राजेंद्र अहिरे, सुरेश माळी, विवेक पाटील यांंचा समावेश आहे. या समितीच्या स्वतंत्र बैठकीत विश्वस्थ समिती अध्यक्ष म्हणून निवड केली जाणार आहे.

या बैठकीत आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाल, सरचिटणीस ललित बुब, आयमाच्या विश्वस्त समितीचे विद्यमान अध्यक्ष धनंजय बेळे, माजी अध्यक्ष विजय तलवार, जे. आर. वाघ, जे. एम. पवार, आर. एम. पवार, एस. एस. आनंद, स्वर्णसिंग बिर्दी, वरुण तलवार आदी उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *