Friday, April 26, 2024
Homeनाशिकअनलॉक ०४ : राज्य सरकारची नियमावली जारी

अनलॉक ०४ : राज्य सरकारची नियमावली जारी

मुंबई । Mumbai (वृत्तसंस्था)

महाराष्ट्रात अनलॉक-4 संदर्भात नियमावली जाहीर केली आहे. राज्य सरकारच्या नवीन नियमावलीनुसार आता जिल्हांतर्गंत प्रवास करताना इ-पासची अट रद्द करण्यात आली आहे. आता इ-पासशिवाय राज्यात प्रवास करता येणार आहे.

- Advertisement -

केंद्राने परवानगी दिल्यानंतरही राज्यात इ-पासची अट कायम ठेवण्यात आली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या टीकेनंतर अखेर राज्य सरकारनें ई-पास संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. 1 सप्टेंबरपासून अनलॉक-4चा टप्पा सुरू होत आहे.

याशिवाय खासगी आणि मिनी बसेसना परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल आणि लॉज यांनाही पूर्णपणे सुरू होण्यास परवानगी देण्यात आल्याने हॉटेल व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.

तसेच, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दररोज 200 उड्डाणांना परवानगी देण्यात आली आहे.

उद्यापासून 100 विमाने जातील व 100 येतील. यापूर्वी आतापर्यंत करोना संकटामुळे हा आकडा 50-50 असा होता. मुंबई आणि एमएमआरमध्ये शासकिय कार्यालय 30 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत.

तर, उर्वरित महाराष्ट्रात सरकारी कार्यालयात 50 टक्के सेवकांच्या उपस्थिती काम सुरू करता येणार आहे. मात्र, सोशल डिस्टनसिंग आणि मास्क वापरणे बंधनकारक आहे.

राज्य शासनाने अनलॉक संदर्भात लागू केलेली नियमावली नाशिक जिल्ह्यात जशीच्या तशी लागू होणार आहे.

सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

हे बंदच राहणार

* शाळा,महाविद्यालये,खासगी क्लासेस

* सिनेमा हॉल,जलतरण तलाव,बार,जिम,ऑडिटोरीयम

* एमएचच्या परवानगीशिवाय आंतरराष्ट्रीय विमान प्रवासास बंदी

* मेट्रो सेवा,लोकल

* सामाजिक, राजकीय, खेळ, मनोरंजन, सांस्कृतिक कार्यक्रम बंदच राहणार

- Advertisment -

ताज्या बातम्या