Saturday, April 27, 2024
Homeनगरविनापरवाना म्हशींची वाहतूक करताना दोघांना पकडले

विनापरवाना म्हशींची वाहतूक करताना दोघांना पकडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

टेम्पोमधून विनापरवाना व अमानुषपणे वागणूक देऊन चार लाख 80 हजार रुपये किमतीच्या 12 म्हशींची वाहतूक करणार्‍या दोघांविरूध्द येथील तोफखाना पोलीस ठाण्यात प्राण्यांना कु्ररतेने वागवण्यास प्रतिबंध करण्यास अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चांगदेव गोरख भालसिंग (वय 31 रा. वाळकी, ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

सलीम कादर इनामदार (वय 53 रा. जुन्नर, जि. पुणे) व कय्युम नझीर कुरेशी (वय 45 रा. शिवाजीनगर, घाटकोपर, नवी मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून चार लाख 80 हजाराच्या 12 म्हशी व सहा लाखांचा टेम्पो असा 10 लाख 80 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. मंगळवारी (दि. 1) दुपारी कल्याण बायपास जवळील सम्राट हॉटेलसमोर ही कारवाई करण्यात आली. मंगळवारी दुपारी फिर्यादी भालसिंग यांना डॉ. आबासाहेब नाईकवाडे यांचा फोन आला व ते म्हणाले, टेम्पो (एमएच 12 एलटी 7254) मधून काही इसम म्हशी घेऊन येणार आहे.

भालसिंग यांनी मित्र अजय नाथा शेळके यांना सोबत घेत कल्याण बायपास येथील सम्राट हॉटेलसमोर थांबले. संशयित टेम्पो येताच त्यांनी तो टेम्पो थांबविला. त्यातील दोघांकडे नावाबाबत विचारणा केली असता त्यांनी त्यांची नावे सांगितली व टेम्पोमध्ये काय आहे याची विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. भालसिंग यांनी पोलिसांना फोन केला असता घटनास्थळी पोलीस आले. त्यांनी टेम्पोची पंचासमक्ष पाहणी केली असता त्यामध्ये 12 म्हशी दाटीवाटीने भरून त्यांना अमानुषपणे वागणूक देऊन विना चारा व पाण्याचे त्यांना वेदना होतील, अशा स्थितीत वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. टेम्पो तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतला असून भालसिंग यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या