Friday, April 26, 2024
Homeनगर‘त्या’ प्रकरणाची पुणे विद्यापीठ प्रशासनाकडून चौकशी सुरु

‘त्या’ प्रकरणाची पुणे विद्यापीठ प्रशासनाकडून चौकशी सुरु

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

नोकरी देण्याच्या बहाण्याने पुणे विद्यापीठाचे बनावट लेटर पॅड व इतर खोटे कागदपत्र वापरून अनेक युवकांची लाखो रुपयांची फसवणूक झालेल्या प्रकरणाची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. विद्यापीठाकडून या गैरप्रकारची तातडीने चौकशी सुरू करण्यात आली आहे. याबाबत सार्वमतने सर्वप्रथम वृत्त प्रसिद्ध करून त्याचा पाठपुरावा सुरू ठेवला आहे.

- Advertisement -

पुणे विद्यापीठाचे खोटे कागदपत्र वापरुन युवकांची फसवणूक प्रकरणात माजी नगरसेवकासह तिघांचा समावेश

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिपाई व क्लार्क या पदासाठी नोकरी लावून देतो असे सांगून संगमनेर शहरातील एका भामट्याने संगमनेर तालुक्यातील व अहमदनगर येथील युवकांना लाखो रुपयांना गुंडावले आहे. संगमनेर येथील मूळचा रहिवासी असलेला परंतु सध्या पुणे येथे स्थायिक असलेल्या या भामट्याने गोड बोलून पुणेे विद्यापीठात नोकरी लावून देतो असे अनेकांना आमिष दाखवले होते. त्याच्या आमिषाला संगमनेर येथील चार व अहमदनगर येथील एक असे पाच जण बळी पडले. त्यांनी नोकरीसाठी लाखो रुपये दिले मात्र त्यांना नोकरी मिळालीच नाही.

पुणे विद्यापीठाचे खोटे लेटर पॅड वापरुन संगमनेरच्या भामट्याकडून युवकांची लूट

या गैरप्रकारात संगमनेर येथील एक माजी नगरसेवक व आणखी एक जण सहभागी आहेत. या चौकडीने पुणे विद्यापीठाचे खोटे लेटर पॅड वापरून संबंधित युवकांना नोकरीच्या ऑर्डर दिल्या. एका जणाला नोकरी लागल्यानंतरचे ओळखपत्रही दिले. मात्र या ओळखपत्रावर कालावधीची मर्यादा नाही. नोकरीची खोटी ऑर्डर दिल्यानंतर या युवकांना पुणे येथे बोलावण्यात आले. मात्र तेथे या युवकांची कोणासोबतही भेट झाली नाही. या युवकांनी आपले पैसे परत द्यावे अशी मागणी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. आर्थिक अमिषाला बळी पडलेल्या काही युवकांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी संपर्क साधून माहिती सांगितली. याबाबत सार्वमत मध्ये वृत्त प्रकाशित झाले.

दैनिक सार्वमतने या प्रकरणाचा पाठपुरावा केल्याने विद्यापीठ प्रशासनाने या गैरप्रकाराची दखल घेतली आहे. पुणे सिटीचे सेवानिवृत्त एसीपी (क्राईम) व सध्या पुणे विद्यापीठाचे सुरक्षा संचालक म्हणून काम पाहत असलेले सुरेश भोसले यांच्यावर विद्यापीठ प्रशासनाने या गैरप्रकारची चौकशी करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे. आपण याबाबत विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणेे यांच्यासोबत चर्चा केली असून या प्रकरणाचा लवकरच छडा लावण्यात येईल, असे त्यांनी ’सार्वमत’शी बोलताना सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या