कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी एकजूट महत्त्वाची – ठोंबरे

jalgaon-digital
1 Min Read

सातपूर | प्रतिनिधी Satpur

कामगारांना आपल्या न्याय हक्कासाठी एकजुटीत राहून प्रसंगी लढा देऊन मिळवून घेण्याचे आवाहन सीटुचे जिल्हाध्याक्ष कॉ. सीताराम ठोंबरे यानी केले.

वाडीवा-हे औद्योगिक वसाहतीमधील फेब इंडस्ट्रीज प्रा ली, कामगारांची वार्षिक सर्वसाधारण सभा सीटू भवन येथे पार पडली. यावेळी कॉ ठोंबरे बोलत होते.

या बैठकीत व्यासपीठावर सिटूचे सरचिटणीस कॉ देविदास आडोळे, अँड कॉ भुषन सताळे, कॉ संतोष काकडे, कॉ तुकाराम सोनजे, कॉ हिरामण तेलोरे हे उपस्थित होते.

यावेळी कामगारांचे प्रश्न व त्यासाठी घेण्यात आलेले विविध उपक्रम याबाबतची माहिती आपल्या मनोगतातून कॉ हेमंत तोकडे कॉ नवनाथ तोकडे कॉ बाळु अवारी कॉ विक्रम गोवर्धणे कॉ गणेश मुसळे यांनी मांडली.

संघटनेच्या ध्येयधोरणांची एकनिष्ठ राहिल्याने न्याय मिळण्यास मदत होणार असल्याचेही विशद केले. यावेळी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *