Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनाशिक सायकलिस्टतर्फे नववर्षाचे अनोखे स्वागत

नाशिक सायकलिस्टतर्फे नववर्षाचे अनोखे स्वागत

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक सायकलिस्टतर्फे नवीन वर्षाचे स्वागत अनोख्या पद्धतीने करण्यात येणार आहे. नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशन Nashik Cyclists Foundation , नेट झिरो इंडिया व आझादी का अमृत महोत्सव पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी आज (दि. 1) ते उद्या (दि.2) या दोन दिवशी सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत झिरो कार्बन डे 2022, नो फ्युल डे 2022 नो व्हेईकल डे 2022, नेट झिरो इंडिया फक्त सायकल, पायी तथा इलेक्ट्रिक वाहनाचा वापर Use of electric vehicle करून नविन वर्षाचे स्वागत एक लाख कि. मी. सायकलिंग चॅलेंज ने पूर्ण करून करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व सायकलिस्ट 10 किमी. पासून ते 100 किमीचे योगदान देणार आहे.

- Advertisement -

या उपक्रमात नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे सर्व सदस्यांबरोबरच औरंगाबाद, जळगाव, धुळे, पुणे, अहमदनगर, संगमनेर, पंढरपूर, शिरपूर, ठाणे, नवी मुंबई, मालेगाव, सटाणा, सिन्नर, येवला, लासलगाव, चाळीसगाव, मनमाड आदी सायकलिस्ट फाऊंडेशन व विविध संस्था, संघटना शाळा, कॉलेज, क्लासेस, शासकीय अस्थापना सहभागी होणार आहेत.

सर्व सहभागी सदस्यांना नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशन तर्फे ई सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात येणार असून जास्तीत जास्त लोकांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे ’यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या