Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्या... तर अजितदादा मुख्यमंत्री होणार; 'या' भाजप नेत्याचे मोठे विधान

… तर अजितदादा मुख्यमंत्री होणार; ‘या’ भाजप नेत्याचे मोठे विधान

मुंबई | Mumbai

काही दिवसांपापूर्वी राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar)हे भाजपमध्ये (BJP)प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर या सर्व चर्चांवर अजित पवारांनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका स्पष्ट करत पडदा टाकला होता. अशातच आता केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve)यांनी अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे विधान केले आहे…

- Advertisement -

नाशिक कृउबा निवडणूक : आमदाराला धमकी; चुंभळे पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल

दानवे यांनी म्हटले की, अजितदादांचा मुख्यमंत्रीपदासाठीच (CM Post)दावा आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढले. तेव्हा काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला (Ncp)जास्त जागा मिळाल्या होत्या. त्याहीवेळी अजित पवार यांना मुख्यमंत्री होता आले नाही. राजकारणातील या घटना आहेत. त्याच मी तुम्हाला सांगत आहे. दावा करणे वेगळी गोष्ट आहे. बहुमत असणे वेगळी गोष्ट आहे. जर बहुमताच्या बाजूने ते आले किंवा कदाचित १०-२० वर्षाने त्यांना बहुमत मिळाले तर ते मुख्यमंत्री होऊ शकतात, असे सुचक वक्तव्य करत रावसाहेब दानवे यांनी अजित पवारांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

भीषण अपघात! ट्रक आणि बसमध्ये धडक, ७ जणांचा मृत्यू

दरम्यान, कालच अजित पवारांनी एका मुलाखतीत बोलताना “मला शंभर टक्के मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यासाठी २०२४ ची वाट का पाहायची”? असे म्हणत आपली महत्वकांक्षा जाहीर केली होती. त्यातच आता केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात असे विधान केल्याने येत्या काळात महाराष्ट्रातील राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या