Friday, April 26, 2024
HomeनाशिकNashik Crime News : केंद्रीय मंत्री भारती पवारांच्या आईची सोनसाखळी चोरट्यांनी...

Nashik Crime News : केंद्रीय मंत्री भारती पवारांच्या आईची सोनसाखळी चोरट्यांनी लांबविली

नाशिक | Nashik

गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात खून, दरोडा, चोरी यासारख्या घटना वाढत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये (Citizens) भीतीचे वातावरण पसरले आहे. अशातच आता नाशिक शहरातील (Nashik City) आरटीओ रोड परिसरात दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार (Union Minister of State Bharti Pawar) यांच्या आईच्या (Mother’s) गळ्यातील सोनसाखळी हिसकावल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे…

- Advertisement -

Bus Fire News : बसला भीषण आग; १५ हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू, अनेक जखमी

याबाबत अधिक माहिती अशी की, केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्या मातोश्री शांताबाई बागुल (Shantabai Bagul) या आरटीओ परिसरामध्ये (RTO Road) राहत असून काल सायंकाळी त्या दुर्गानगर भागात भाजी आणण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी दुचाकीवरून (Bike) आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यात हात टाकत दोन ते अडीच तोळ्याची सोनसाखळी हिसकावत पळ काढला. यावेळी सोनसाखळी ओरबाडल्याचे कळाल्यानंतर बागुल यांनी आरडाओरड केली, मात्र आजूबाजूला माणसे नसल्याने संशयित पसार झाले.

Chandrayaan-3 चंद्रापासून अवघ्या 25 किमी अंतरावर, बुधवारी ‘या’ वेळेला चंद्रावर उतरणार

दरम्यान, या घटनेनंतर शांताबाई बागुल यांनी तात्काळ म्हसरूळ पोलीस स्टेशन (Mhasrul Police Station) गाठत तक्रार दाखल केली. तर घटनास्थळावरून संशयित फरार झाल्याने पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या (CCTV Camera) आधारे शोध सुरु केला असून संशयितांची अद्याप ओळख पटलेली नाही.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

सुपरस्टार रजनीकांत पडले CM योगींच्या पाया, Video व्हायरल

- Advertisment -

ताज्या बातम्या