Saturday, April 27, 2024
Homeनगरपोलिसांना पुढे करून दहशत निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न- आ. विखे

पोलिसांना पुढे करून दहशत निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न- आ. विखे

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांना झालेल्या अटकेचा आ. राधाकृष्ण विखे पाटील (MLA Radhakrishna Vikhe Patil) यांनी निषेध (Protested) केला आहे. पोलिसांना (Police) पुढे करून सरकारने (Government) राज्यात एकप्रकारची दहशतच निर्माण केली असल्याचा आरोप (Allegations) त्यांनी केला.

- Advertisement -

आ. विखे पाटील (MLA Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले की, मंत्री राणे (Union Minister Narayan Rane) यांच्या पाठीशी भाजप (BJP) खंबीरपणे उभा आहे. राज्यात केंद्रीय मंत्र्यांच्या सुरू असलेल्या यात्रांना मिळत असलेल्या प्रतिसादामुळे अस्वस्थ झालेल्या महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. यापूर्वी भाजपच्या नेत्यांवर (BJP Leder) शिवसेनेकडून (Shivsena) अतिशय खालच्या स्तरावर जाऊन टीका केली (Criticized) गेली. त्यावेळी पोलिसांना कायदा आठवला नाही. आजपर्यंतच्या झालेल्या दसरा मेळाव्यातील शिवसेना नेत्यांची वक्तव्यही पोलीस प्रशासनाने दुर्लक्षित केली. मग पोलिसांना कायद्याचा साक्षात्कार आताच कसा झाला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पोलीस बळाचा वापर करून राज्यात सरकारने (Maharashtra Government) निर्माण केलेले वातावरण आणि दहशत अतिशय दुर्दैवी असून भाजप कार्यालयावर (BJP Office) आणि कार्यकर्त्यांवर झालेले हल्ले सुध्दा सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप आ. विखे पाटील (MLA Radhakrishna Vikhe Patil) यांनी केला.

राज्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय संयम बाळगला आहे. परंतु अधिक अंगावर येण्याचा कोणी प्रयत्न केलाच तर जशास तसे उतर देण्याची आमची तयारी असल्याचा इशारा आ. विखे (MLA Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या