Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याकेंद्रीय गृहमंत्रालयाने अग्निवीरांसाठी केली 'ही' मोठी घोषणा

केंद्रीय गृहमंत्रालयाने अग्निवीरांसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा

नवी दिल्ली । New Delhi

केंद्र सरकारच्या (Central Government) लष्कर भरतीसाठी (Army Recruitment) आणलेल्या अग्निपथ योजनेला (Agneepath Scheme) देशभरातून तीव्र विरोध होत आहे. तर बिहारमध्ये (Bihar) या नव्या योजनेबाबत तरुणांचा संताप थांबताना दिसत नाही. बिहारमध्ये सलग तिसऱ्या दिवशीही निदर्शने सुरू असून आंदोलक (Agitator) तरुण रस्त्यावर उतरले आहेत. त्यातच आता केंद्रीय गृहमंत्रालयाने (Union Home Ministry) या योजनसंदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे….

- Advertisement -

केंद्रीय गृहमंत्रालयाने केलेल्या घोषणेनुसार, आता सीएपीएफ (CAPF) आणि आसाम रायफल्समध्ये (Assam Rifles) अग्निवीरांना १० टक्के आरक्षण (Reservations) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबतची माहिती ट्विट करत दिली आहे. मंत्रालयाने ट्विट केले की, ‘गृह मंत्रालयाने अग्निपथ योजनेंतर्गत CAPF आणि आसाम रायफल्समध्ये भरतीमध्ये ४ वर्षे पूर्ण केलेल्या अग्निवीरांसाठी १० टक्के रिक्त जागा राखून ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. तसेच पहिल्या वर्षी या योजनेसाठी वयोमर्यादा २ ने वाढवून २१ ऐवजी २३ वर्षे करण्यात आली आहे.

तर करोनामुळे (CORONA) लांबलेल्या २ वर्षांच्या भरतीप्रक्रियेमुळे या योजनेतील उमेदवारांना भरतीसाठीची वयोमर्यादा वाढविण्यात आली आहे. याव्यतिरिक्त CAPF आणि आसाम रायफल्सने अग्निवीरांना भरतीसाठी निर्धारित केलेल्या कमाल प्रवेश वयोमर्यादेत ३ वर्षांची आणि अग्निपथ योजनेच्या पहिल्या बॅचसाठी ५ वर्षे सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्सच्या भरतीमध्ये अग्निपथ योजनेंतर्गत भरती झालेल्या अग्निवीर सैनिकांना प्राधान्य दिले जाईल, अशी घोषणा गृह मंत्रालयाने बुधवारी केली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या