Omicron Variant : ओमिक्रॉनचं संकट! केंद्र सरकार सतर्क, राज्यांना दिल्या ‘या’ सूचना

jalgaon-digital
3 Min Read

दिल्ली l Delhi

दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आढळून आलेल्या करोना व्हायरसच्या (Corona Virus) नवीन ओमिक्रॉन (Omicron Variant) व्हेरिएंटमुळे एकच खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकार संरक्षणात्मक पावले उचलत आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण (Union Health Secretary Rajesh Bhushan) यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून ओमिक्रॉनचा संसर्ग टाळण्यासाठीच्या सूचना केल्या आहेत.

राज्यांना कोविड चाचणी (corona test0 पायाभूत सुविधा वाढवण्यासही सांगण्यात आले आहे. त्यामुळे नवीन कोविड विषाणूची कोणतीही लाट असल्यास, सुधारित चाचणी केंद्रे कार्यरत असावीत. काही राज्यांमध्ये RT-PCR चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याचे आढळून आले आहे. पुरेशी चाचणी नसल्यास, संसर्ग पसरण्याची खरी पातळी निश्चित करणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे, राज्यांनी चाचण्यांच्या पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

कुठल्याही हॉटस्पॉट्सला लगेच कंटेनमेंट झोन म्हणून निर्धारित करण्याच्याही सुचना आहेत. केंद्र सरकारच्या पत्रात असेही म्हटले आहे की राज्य सरकारने उपचारासाठी पुरेशा वैद्यकीय सुविधा तयार कराव्यात, ज्या संपूर्ण राज्य क्षेत्रामध्ये आणि विशिष्ट ठिकाणी केंद्रित केले जाऊ नये.

सर्व राज्यांनी ‘टेस्ट-ट्रॅक-ट्रीट-लसीकरण’ (Test-Track-Treat Vaccination) या तत्त्वाची आणि कोविड योग्य वर्तनाची कठोर अंमलबजावणी सुनिश्चित करावी. आणि MoHFW मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रतिबंधात्मक उपाय करावे, अशा सुचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, जवळपास सर्व राज्यांनी नवीन कोविड प्रकाराबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

ज्या भागात अलीकडील पॉझिटिव्ह केसेस जास्त आहेत, त्या हॉटस्पॉट्सचे सतत निरीक्षण करणे. सर्व हॉटस्पॉट्समध्ये, चाचण्या करून पोसिटीव नमुने नियुक्त INSACOG लॅबमध्ये त्वरीत जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्याचे आदेश दिले गेले आहेत. या प्रयोगशाळा भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभाग (DBT) आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रच्या (NCDC) अंतर्गत आहेत.

तसेच आरोग्यविषयक पायाभूत सुविधा आणखी मजबूत करण्याची सूचना केंद्राने राज्यांना दिली आहे. महासाथीच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उभारण्याची सूचना केंद्राने केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले होते. अनेकांचे ऑक्सिजन अभावी हाल झाले होते.

दरम्यान, महारष्ट्रातील राज्य सरकारही सतर्क झाले असून विषाणूच्या या नव्या संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ, नये यासाठी राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी सरकारकडून दक्षिण आफ्रिकेतून सुरू असणाऱ्या विमान सेवेवर बंदी घालण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरू आहे. आज संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील कोरोना परिस्थिती आणि नव्या व्हेरियंट बाबत करण्यात आलेल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. या बैठकीला आरोग्य मंत्री राजेश टोपे, टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *