Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशCOVID19 : केंद्राकडून नव्या गाईडलाईन्स जारी, रुग्णांना 'हा' सल्ला

COVID19 : केंद्राकडून नव्या गाईडलाईन्स जारी, रुग्णांना ‘हा’ सल्ला

दिल्ली | Delhi

देशात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा करोनाच्या रुग्णांमध्ये (covid19 patient) सातत्याने वाढ होत आहे. दुसरीकडे करोनाच्या ओमायक्रॉन (omicron) व्हेरिएंटचे रुग्णही मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. ओमिक्रॉनच्या नवीन प्रकारांची प्रकरणे ज्या वेगाने वाढत आहेत, त्यामुळे एक नवीन समस्या उद्भवू शकते, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

- Advertisement -

दरम्यान करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने (India Government) नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. केंद्र सरकारने सौम्य लक्षणं असलेल्या आणि लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांसाठी आयसोलेशनच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. यानुसार पॉझिटव्ह अहवाल आल्यानंतर सात दिवस आणि सलग तीन दिवस ताप नसेल तर रुग्णाचा विलगीकरण कालावधी संपेल. तसंच यानंतर पुन्हा चाचणी करण्याची आवश्यकत नाही.

नव्या नियमावलीनुसार केंद्र सरकारने करोनाची सौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांना घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. तसंच ट्रिपल लेअऱ मास्क वापरण्याचं आवाहनही केलं आहे. होम आय़सोलेशनबाबत नव्या गाइडलान जारी करताना केंद्र सरकारने वयोवृद्ध रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आयसोलेशनची परवानगी मिळेल. तसंच सौम्य लक्षणं असलेल्यांना व्हेंटिलेशन नीट असेल तरच घरी राहण्यासाठी परवानगी दिली जाईल. रुग्णांना जास्तीजास्त लिक्विड घेण्यासही सांगण्यात आलं आहे.

ज्या रुग्णांना एचआयव्ही, ट्रान्सप्लांट, कॅन्सर इत्यादी झालं असेल त्यांना आयसोलेशनसाठी डॉक्टरांच्या परवानगीची आवश्यकता असेल. लक्षणं नसलेल्या आणि सौम्य लक्षणं असलेल्या ज्या रुग्णांची ऑक्सिजन पातळी ९३ टक्क्यांपेक्षा जास्त असेल त्यांना घरी क्वारंटाइन राहता येईल. रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सिटी स्कॅन आणि छातीचा एक्सरे काढू नये असंही केंद्र सरकारने म्हटलं आहे.

तसेच केंद्र सरकारने रुग्णांना आपल्या आरोग्यसंबंधीचा तपशील नोंदण्यास सांगितले आहे. तारीख आणि वेळेसह, शरीराचे तापमान, हृदय गती, ऑक्सिजन पातळी, तुम्हाला कसे वाटते (चांगले किंवा खूप वाईट) आणि श्वासोच्छवासाची स्थिती लिहून ठेवण्याची शिफारस केली आहे.

दरम्यान देशात गेल्या २४ तासात तब्बल ५८ हजार ०९७ नवे रुग्ण सापडले आहेत. तर दिवसभरात ५३४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच १५ हजार ३८९ जण करोनामुक्त होऊन घरी परतले असून आतापर्यंत ३ कोटी ४३ लाख २१ हजार ८०२ जणांनी करोनावर मात केली आहे. तर ४ लाख ८२ हजार ५५१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात २ लाख १४ हजार ४ जण करोनावर उपचार घेत आहेत. तसेच देशातील ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या २ हजार १३५ झाली आहे. यामध्ये महाराष्ट्र आणि दिल्लीतून सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक ६५३ आणि दिल्लीत ४६४ रुग्ण आढळले आहेत. ओमायक्रॉनवरील २ हजार १३५ रुग्णांपैकी ८२८ बरे झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या