Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशUnion Budget 2021 : सोने-चांदीच्या व्यवहारांबद्दल अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

Union Budget 2021 : सोने-चांदीच्या व्यवहारांबद्दल अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

दिल्ली l Delhi

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेला अर्थसंकल्प २०२१-२२ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी संसदेत सादर केला. सकाळी ११ वाजता सीतारामन यांनी संसदेमध्ये अर्थसंकल्प वाचण्यास सुरुवात केली.

- Advertisement -

यंदाच्या अर्थसंकल्पावर करोना प्रादुर्भाव, मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर असं मोठं संकट होतं. करोना महामारी, अर्थव्यवस्थेचे रुतलेले चाक आणि बेरोजगारीचा गंभीर प्रश्न या सर्व समस्यांवर उपाय म्हणून यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होत. सोन्या-चांदीच्या व्यवहारांबाबत पारदर्शकता आणण्यासाठी निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली.

सर्वसामान्यांपासून उद्योजक आणि व्यापाऱ्यांमध्ये जिव्हाळ्याचा विषय असलेल्या सोन्या-चांदीच्या व्यवहारांबद्दल एक मोठी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. सोने-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी होणार असल्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात कपात होणार आहे. त्यामुळे सणासुदीच्या तोंडावर सोने-चांदी खरेदी करु इच्छिणाऱ्या ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तसेच सोन्याच्या व्यवहारांवर यापुढे सेबीचा (Security Exchange Board of India) अंकुश असेल. सराफा बाजार सेबीच्या नजरेखाली आल्यामुळे करउत्पन्न आणि पारदर्शी व्यवहारांना यांना चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.

सेबीला आणखी मजूबत करणार

सेबी कायदा १९९२, डिपॉझिटरीज कायदा १९९६, सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स रेग्युलेशन १६५६ आणि गव्हर्मेंट सिक्युरिटीज कायदा २००७ यांच्यातील तरतुदींचे एकीकरण करून केवळ एकमेव सुयोग्य सिक्युरिटिज मार्केट संहिता तयार करणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या